३५ कारखान्यांचा बाजार हजार कोटीत
By Admin | Published: April 18, 2016 11:28 PM2016-04-18T23:28:22+5:302016-04-19T01:00:57+5:30
राजू शेट्टी : ‘ईडी’कडे सर्व कागदपत्रे सादर करणार; ‘पनामा पेपर्स’सारखाच काळ्या पैशाचा मोठा घोटाळा असण्याची शक्यता
सांगली : राज्यातील ३५ सहकारी साखर कारखाने अवघ्या १०७६ कोटी रुपयांमध्ये खासगी कंपन्यांना विकले गेल्याची बाब सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) कागदपत्रांसह सादर करणार आहोत. त्या आधारे कारखाना खरेदी करणाऱ्या कंपन्या, त्यांचे संचालक, सभासद आणि गुंतवलेल्या संपूर्ण रकमेची चौकशी संचालनालयाने करावी, अशी मागणी सोमवारी खासदार राजू शेट्टी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
ते म्हणाले की, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीची कागदपत्रे नुकतीच आम्ही मिळविली आहेत. ‘पनामा पेपर्स’सारखाच काळ््या पैशाचा मोठा घोटाळा समोर आला आहे. परदेशातील काळा पैसा आणण्यापूर्वी पंतप्रधानांनी महाराष्ट्रात कारखानदारीत गुंतलेला काळा पैसा उजेडात आणावा. गिरणा कारखान्याच्या खरेदीप्रकरणी केवळ छगन भुजबळांना अटक करण्याचे नाटक करण्यापेक्षा राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करावी. यासंदर्भातील सर्व कागदपत्रे आम्ही द्यायला तयार आहोत. कारखाना उभारताना चारशे ते पाचशे कोटी रुपये खर्च येत असताना त्याची विक्री अवघ्या १७ ते १८ कोटी रुपयांना कशी होते, हा साधा प्रश्न आहे. या कारखान्यांचे मूल्यांकन कोणी केले, याचाही तपास करावा.
रितसर चौकशी झाली, तर भुजबळांनंतर कारखानदारांची रांगच्या रांग तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाही. सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भातील प्राथमिक चर्चा झाली आहे. त्यांची भेट घेऊन आम्ही आमच्याकडील माहिती सादर करू. ईडीने कोणतीही कारवाई केली नाही, तर या विभागाचे प्रमुख असणारे केंद्रीय अर्थमंत्री तसेच पंतप्रधानांकडे दाद मागू. महाराष्ट्रातील प्रतिष्ठित राजकारणी आणि कारखानदारांनी साखर कारखानदारीत काळा पैसा गुंतवला आहे. सहकारी साखर कारखाने विकत घेणाऱ्या कंपन्यांचे भागधारक व संचालक यांची चौकशी केल्यास त्यामध्येही बोगसगिरी आढळून येईल. काही मोजके कारखानेच सहकारी संस्थांनी खरेदी केले असून, उर्वरित कारखाने खासगी कंपन्यांनीच खरेदी केले आहेत, असे शेट्टी म्हणाले. (प्रतिनिधी)
विकले गेलेले सहकारी साखर कारखाने
कारखानाखरेदीदारविक्रीची रक्कम
मराठवाडा (जि. हिंगोली)भाऊराव चव्हाण कारखाना१५ कोटी ८८ लाख
विनायक, औरंगाबादमैत्री ट्रेडर्स, श्रीरामपूर४ कोटी ८0 लाख
संजय, धुळेसागर, एस.एस.के. लि. जालना३ कोटी ५२ लाख
शेतकरी धमणगाव, अमरावतीशरद एस.एस.के. लि.३ कोटी ३६ लाख
शिंदखेडा, धुळेसिटसॉन इंडिया लि. ठाणे१0 कोटी ८0 लाख
गोदावरी दुधणा, परभणीरत्नप्रभा शुगर्स लि. परभणी२३ कोटी ७५ लाख
बाराशीव हनुमान, हिंगोलीपूर्णा सहकारी कारखाना, हिंगोली२८ कोटी
अंबादेवी, अमरावतीकायनेटिक पेट्रोलियम, मुंबई१५ कोटी २५ लाख
बालाघाट, लातूरसिद्धी शुगर्स, लि. अहमदनगर३0 कोटी ५१ लाख
राम गणेश गडकरी, नागपूरप्रसाद शुगर्स, अहमदनगर१२ कोटी ९५ लाख
महात्मा, वर्धामहात्मा शुगर्स, वर्धा१४ कोटी १० लाख
वैणगंगा, भंडारावैणगंगा शुगर्स, भंडारा१४ कोटी १० लाख
शंकर, यवतमाळसागर वाईन्स्, जालना१९ कोटी २५ लाख
अकोला जिल्हा कारखानाव्यंकटेश्वर अॅग्रो शुगर्स१७ कोटी १० लाख
गाणगापूर, औरंगाबादराजाराम फूड, अंधेरी२९ कोटी १ लाख
जरंडेश्वर, सातारागुरू कमोडिटी, मुंबई६५ कोटी ७५ लाख
नरसिंहा, परभणीत्रिधरा शुगर्स४० कोटी २५ लाख
पुष्पदंतेश्वर, नंदुरबारअस्टोरिया ज्वेलर्स, मुंबई४५ कोटी ४८ लाख
राजे विजयसिंह डफळे, सांगलीराजारामबापू कारखाना, सांगली४७ कोटी ८० लाख
कारखानाखरेदीदारविक्रीची रक्कम
कोंडेश्वर, अमरावतीसुदीन कन्सल्टन्सी, कोल्हापूर१४ कोटी १ लाख
जालना, जालनातपाडिया कन्स्ट्रक्शन, औरंगाबाद४२ कोटी ३१ लाख
हुतात्मा जयवंतराव पाटील, नांदेडभाऊराव चव्हाण सह. कारखाना४८ कोटी ५१ लाख
जय अंबिका, नांदेडकुटूकर शुगर्स, नांदेड३३ कोटी ५0 लाख
गिरणा, नाशिकआर्मस्ट्रॉँग इन्फ्रास्ट्रक्चर, नाशिक२७ कोटी ५५ लाख
दत्त कारखाना, कोल्हापूरदालमिया शुगर्स१0८ कोटी
कन्नड, औरंगाबादबारामती अॅग्रो, पुणे५0 कोटी २0 लाख
श्रीराम, नागपूरव्यंकटेश्वर पॉवर्स, कोल्हापूर११ कोटी ९७ लाख
शिवशक्ती, बुलढाणाबीझ सेक्युअर लॅब१८ कोटी ९९ लाख
ग्रुश्नेश्वर, औरंगाबादउमंग शुगर्स३५ कोटी ६२ लाख
श्री बागेश्वरी, जालनाश्रद्धा एनर्जी, पुणे४४ कोटी १0 लाख
जगदंबा, अहमदनगरइंडोकॉन अंबालिका, अहमदनगर२८ कोटी
यशवंत, सांगलीश्री गणपती संघ५६ कोटी ५१ लाख
संत मुक्ताबाई, जळगावश्रद्धा एनर्जी, पुणे३0 कोटी ८५ लाख
शंकर, नांदेडभाऊराव चव्हाण सह. कारखाना१४ कोटी ७५ लाख
प्रियदर्शनी, लातूरविकास सह. कारखाना, लातूर६९ कोटी ७५ लाख
राज्यातील सहकारी साखर कारखाने
कोटी रुपयांमध्ये खासगी कंपन्यांना विकले
1076