संजयनगर परिसरातील मंडई केवळ कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:46 AM2021-02-18T04:46:46+5:302021-02-18T04:46:46+5:30
संजयनगर : सांगली शहरातील संजयनगर परिसरात कोणत्याही प्रकारची भाजीमंडळी नसल्याने आठवडा बाजार रस्त्यावर भरत असतो. यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात ...
संजयनगर : सांगली शहरातील संजयनगर परिसरात कोणत्याही प्रकारची भाजीमंडळी नसल्याने आठवडा बाजार रस्त्यावर भरत असतो. यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होतो. सांगलीत मोठ्याप्रमाणे विस्तार झाला आहे. त्या मानाने या परिसरामध्ये कोणत्याही ठिकाणी भाजीमंडई नाही.
शहरातील अनेक विक्रेते संजयनगर येथे बुधवारी व महात्मा गांधी कॉलनी येथे मंगळवारी आठवडा बाजारात भाजीविक्रीसाठी येतात. हा बाजार रस्त्यावर भरला जातो. सांगली, आरग, मिरज, बेडग, नांद्रे, वसगडे या परिसरातून व्यापारी बाजारात विक्रीसाठी येतात. मंगळवारी महात्मा गांधी कॉलनी आणि संजयनगर रस्त्यावरील हा बाजार भरत असतो. या ठिकाणी लोकसंख्या जास्त असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी होते. बाजारात होणारी गर्दी लक्षात घता हा बाजार स्वतंत्र मोकळ्या जागेत भरावा व पार्किंगची व्यवस्था करावी, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.
चाैकट
लोकप्रतिनिधी व प्रशासनाने समस्या सोडवावी
येथील आठवडा बाजाराची समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पुढे येण्याची गरज आहे. योग्य रचना करून कारवाई व्हावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. संजयनगर परिसरातील आठवडा बाजार हा केवळ कागदावरच राहिला आहे. रस्त्यावरील बाजारामुळे आरोग्यदेखील धोक्यात येण्याची शक्यता आहे.
फोटो-१७
फोटो ओळी : सांगली शहरातील महात्मा गांधी कॉलनीत रस्त्यावरच मंगळवारचा आठवडा बाजार भरत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. छाया : सुरेंद्र दुपटे