मार्केट यार्डातील व्यवहार आजपासून चोºयांमुळे बंद, सांगलीत निर्णय : तपास होत नसल्याने व्यापारी वर्ग नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:09 AM2018-01-05T00:09:57+5:302018-01-05T00:10:44+5:30

सांगली : मार्केट यार्डात गेल्या दोन वर्षात चोरीच्या ३० हून अधिक घटना घडूनही त्यांचा तपास होत नाही. यार्डातील दुकानांना संरक्षण पुरविण्याची बाजार समितीची जबाबदारी असतानाही,

Market Yard Banded Today, Charges Against Charges: Sangliat Decision: Traders are unhappy for not being investigated | मार्केट यार्डातील व्यवहार आजपासून चोºयांमुळे बंद, सांगलीत निर्णय : तपास होत नसल्याने व्यापारी वर्ग नाराज

मार्केट यार्डातील व्यवहार आजपासून चोºयांमुळे बंद, सांगलीत निर्णय : तपास होत नसल्याने व्यापारी वर्ग नाराज

Next
ठळक मुद्देआजवर त्यातील एकाही चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाहीपोलिसांकडून कार्यवाही होत नसल्याचा व्यापाºयांचा आरोप

सांगली : मार्केट यार्डात गेल्या दोन वर्षात चोरीच्या ३० हून अधिक घटना घडूनही त्यांचा तपास होत नाही. यार्डातील दुकानांना संरक्षण पुरविण्याची बाजार समितीची जबाबदारी असतानाही, कमी रखवालदार आहेत, पोलिसांकडूनही चोºयांचा छडा लावण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ गुरूवारपासून मार्केट यार्डातील सर्व व्यवहार बेमुदत व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाºयांनी घेतला आहे.

दरम्यान, चोरीच्या वाढत्या घटनांमुळे व्यापारी दहशतीखाली असून, जोपर्यंत चोºयांचा छडा लागत नाही, तोवर व्यवहार बंद ठेवण्याचा इशारा चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
चोरीच्या ३० घटना घडल्या आहेत. आजवर त्यातील एकाही चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. चोरीची घटना घडली की, पोलिस येतात, पंचनामा करतात, श्वानपथकालाही पाचारण करण्यात येते. हे पथक ठराविक भागापर्यंत माग दाखवते. मात्र त्यावर पोलिसांकडून कार्यवाही होत नसल्याचा व्यापाºयांचा आरोप आहे.

सर्व दुकाने व गोदामांना सेवा-सुविधा पुरविण्याची कृषी उत्पन्न बाजार समितीची जबाबदारी आहे. असे असले तरी एवढ्या मोठ्या मार्केट यार्डात संरक्षणासाठी केवळ १० रखवालदार कार्यरत असतात. त्यांच्याकडून सर्वत्र रखवालीचे काम होत नसल्यानेच वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत. बुधवारी मध्यरात्रीही यार्डातील तीन दुकाने फोडली आहेत. यात लॅपटॉपसह व्यापाºयांची महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेली आहेत. त्यामुळेच गुरूवारी व्यापाºयांच्या संयमाचा बांध फुटला व त्यांनी एकत्र येत, जोवर चोरींच्या घटनांना आळा बसत नाही, तोवर संपूर्ण व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी चेंबर आॅफ कॉमर्सचे गोपाल मर्दा, बाजार समिती संचालक मुजीर जांभळीकर, शीतल पाटील, प्रदीप पाटील, प्रशांत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

व्यापारी दहशतीखाली : शरद शहा
मार्केट यार्डात वारंवार चोरीच्या घटना होत असून, यामुळे व्यापारी प्रचंड दहशतीखाली आहेत. आजवर झालेल्या चोरीतील एकाही चोरीचा छडा लागलेला नाही. यामुळेच सर्व व्यवहार बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहेत. व्यापाºयांना संरक्षणाबाबत हमी मिळेपर्यंत बंद चालूच ठेवणार आहे, अशी माहिती चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा यांनी दिली.

Web Title: Market Yard Banded Today, Charges Against Charges: Sangliat Decision: Traders are unhappy for not being investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.