आरटीओ कार्यालयात मास्क बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:19 AM2021-07-02T04:19:34+5:302021-07-02T04:19:34+5:30
सांगली : कोरोनामुळे कमी क्षमतेने सुरू असलेल्या येथील आरटीओ कार्यालयातील कामकाज आता सुरु झाले आहे. नागरिकांची वाढती गर्दी लक्षात ...
सांगली : कोरोनामुळे कमी क्षमतेने सुरू असलेल्या येथील आरटीओ कार्यालयातील कामकाज आता सुरु झाले आहे. नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता, आरटीओ कार्यालयात मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. यामुळे कार्यालयात शिस्त लागली असून, बाहेरील व्यक्तींना मास्कशिवाय प्रवेश दिला जात नाही. या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
-----
टिंबर एरियामध्ये रस्त्यावर पाणीच पाणी
सांगली : गेल्या आठवड्यापासून पावसाने ओढ दिली असली तरी टिंबर एरियामध्ये मात्र रस्त्यावर पाणी कायम आहे. अगोदरच या भागातील रस्ते खचले आहेत. त्यात पाणी आल्याने वाहनधारकांची अडचण होत आहे. मेहता रुग्णालयाजवळून माधवनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचून राहिलेले असते.
-----
डॉक्टरांचे कार्य अभिमानास्पद; जिल्हाधिकारी
सांगली : सध्या सुरु असलेल्या कोरोना संकटातही गेल्या दीड वर्षापासून डाॅक्टर जिवाची बाजी लावून अविरतपणे रुग्णांची सेवा करत आहेत. संकटावर मात करुन ते करत असलेले काम पाहता तेच खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे आहेत, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी काढले. ‘डॉक्टर्स डे’निमित्त आयोजित शुभेच्छा कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत डॉक्टरांना प्रोत्साहन दिले.