मास्कमुळे त्वचेला सुटतेय खाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:27 AM2021-07-27T04:27:13+5:302021-07-27T04:27:13+5:30

संतोेष भिसे- लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनापासून बचावासाठी गेल्या दीड वर्षांपासून मास्कचा अखंड वापर सुरू आहे, आता त्याचे ...

The mask relieves itchy skin | मास्कमुळे त्वचेला सुटतेय खाज

मास्कमुळे त्वचेला सुटतेय खाज

Next

संतोेष भिसे- लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनापासून बचावासाठी गेल्या दीड वर्षांपासून मास्कचा अखंड वापर सुरू आहे, आता त्याचे दुष्परिणामही समोर येऊ लागले आहेत. त्वचेवर चट्टे निर्माण होणे, शुद्ध हवेच्या पुरवठ्याअभावी घुसमटणे या दुष्परिणामांना तोंड द्यावे लागत आहे. सॅनिटायझरचा अति वापरही ॲलर्जी निर्माण करत असल्याचे वैद्यकीय क्षेत्राचे निरीक्षण आहे.

बॉक्स

मास्कचा वापर आवश्यकच, पण त्वचेचे रक्षणही महत्त्वाचे...

कोरोना रोखण्यासाठी मास्कचा वापर अत्यावश्यकच आहे, पण त्वचेचे रक्षणही महत्त्वाचेच आहे. सुती कापडाचा मास्क वापरणे, हवा खेळती राहील, याची काळजी घेणे, मास्क सतत स्वच्छ ठेवणे हे काही उपाय आहेत. प्लास्टीक धाग्यांनी बनवलेला मास्क अजिबात वापरू नये. मास्कमधून घामाचा निचरा होणेही आवश्यक आहे.

बॉक्स

सॅनिटायझरऐवजी साबण चांगला

- दैनंदिन स्वच्छतेसाठी सॅनिटायझरऐवजी साबण कधीही योग्य ठरतो.

- कामावर सॅनिटायझर वापरला, तरी घरी साबणाने स्वच्छ हात धुवावेत.

- सॅनिटायझरमुळे ॲलर्जी उद्भवत असल्याची उदाहरणे समोर आली आहेत.

कोट

त्वचाविकार टाळा

मास्क अतिशय घट्ट बांधू नका. शक्यतो, सुती कपडाच वापरा, त्यातून घामाचा निचरा होईल, याकडे लक्ष द्या. पुरळ किंवा पांढरे चट्टे दिसल्यास त्वरित उपचार घ्या. सॅनिटायझरचा वापर गरजेनुसारच वापर करा. शक्यतो, साबण वापरा. साबण हाताला लाऊन काही मिनिटे थांबा, नंतर हात धुवा. यातून अपाय टळतील.

- डॉ.दयानंद नाईक, त्वचाविकार तज्ज्ञ

Web Title: The mask relieves itchy skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.