मसुचीवाडीमध्ये आगीत गंजी जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:24 AM2021-03-22T04:24:09+5:302021-03-22T04:24:09+5:30
बोरगाव : मसुचीवाडी (ता. वाळवा) येथे विद्युत तारांमध्ये शॉर्टसर्क्रिट होऊन लागलेल्या आगीत कडब्याची गंजी जळून खाक झाली; तर ट्रॅक्टरसह ...
बोरगाव : मसुचीवाडी (ता. वाळवा) येथे विद्युत तारांमध्ये शॉर्टसर्क्रिट होऊन लागलेल्या आगीत कडब्याची गंजी जळून खाक झाली; तर ट्रॅक्टरसह अन्य वाहनांचे नुकसान झाले. तर आग विझविताना संभाजी कदम हे जखमी झाले. यात त्यांचे लाखाचे नुकसान झाले आहे.
मसुचीवाडीचे माजी उपसरपंच संभाजी कदम यांच्या घरासमोरून विद्युत तारा गेल्या आहेत. या तारांवर अंगणातील नारळाची फांदी पडल्याने शाॅर्टसर्किट झाले. त्याच्या ठिणग्या तारांखाली असणाऱ्या कडब्याची गंजी व उसाच्या वाड्याच्या गंजीवर पडली. बघता बघता अगीने रैद्र रूप धारण केले. गंजीजवळच ट्रक्टर व इतर वहानांनाही या आगीच्या झळा लागल्या. यावेळी संभाजी कदम यांनी ट्रॅक्टरला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कदम यांना भाजले. त्यांनी आरडाओरडा करताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. या आगीत कदम यांचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले.