हुतात्मा नानकसिंग विद्यालयात २४ रोजी गणित मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:40 AM2021-02-23T04:40:17+5:302021-02-23T04:40:17+5:30

डोंबिवली येथील कृपासिंधू ट्रस्टर्फे हुतात्मा नानकसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २४ फेब्रुवारी रोजी नर्मदा प्रकाशनचे ...

Mathematics guidance on 24th at Hutatma Nanak Singh Vidyalaya | हुतात्मा नानकसिंग विद्यालयात २४ रोजी गणित मार्गदर्शन

हुतात्मा नानकसिंग विद्यालयात २४ रोजी गणित मार्गदर्शन

Next

डोंबिवली येथील कृपासिंधू ट्रस्टर्फे हुतात्मा नानकसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २४ फेब्रुवारी रोजी नर्मदा प्रकाशनचे लेखक प्रा. नारायण गव्हाणे यांचे गणित विषयावर मार्गदर्शन आयोजित केले आहे, अशी माहिती कृपासिंधू ट्रस्टचे अध्यक्ष मारुती सिरसट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

इयत्ता १० वी चा बदललेला अभ्यासक्रम व त्यानुसार गणित, भूमितीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. परीक्षेचे स्वरूपही बदलले आहे. परीक्षेसाठी कृती पत्रिका असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार विजेते व राज्यभर गणिताचे व्याख्यान देणारे नर्मदा प्रकाशनचे लेखक प्रा. नारायण गव्हाणे यांचे मार्गदर्शन सोनवडे ता. शिराळा येथील हुतात्मा नानकसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत आयोजित केले आहे.

Web Title: Mathematics guidance on 24th at Hutatma Nanak Singh Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.