कुपवाडला मटकाबुकीचा अड्डा उद्धवस्त, एलसीबीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 05:08 PM2020-12-04T17:08:59+5:302020-12-04T17:11:17+5:30

Crimenews, sangli, police कुपवाड (ता. मिरज) येथील मटका बुकीचा अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून रोख रकमेसह २ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी बुकीचालकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

Matkabuki's base destroyed in Kupwad | कुपवाडला मटकाबुकीचा अड्डा उद्धवस्त, एलसीबीची कारवाई

कुपवाडला मटकाबुकीचा अड्डा उद्धवस्त, एलसीबीची कारवाई

Next
ठळक मुद्देकुपवाडला मटकाबुकीचा अड्डा उद्धवस्तएलसीबीची कारवाई : अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

सांगली : कुपवाड (ता. मिरज) येथील मटका बुकीचा अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून रोख रकमेसह २ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी बुकीचालकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्यात बुकीचालक झाकीर बाबासाहेब मुजावर (वय ४८, रा. बसस्थानकाजवळ, कुपवाड), शकील नसीसाब ढोले (३४, उल्हासनगर), रज्जब मुसा मुजावर (३६, समतानगर), भीमराव बाबुराव शिंदे (६६, समतानगर), दशरथ रामचंद्र जावळे (६०, रा. समतानगर), नासीर कासीम मुश्रीफ (४२, रा. मुजावर गल्ली, मिरज) या सहा जणांचा समावेश आहे.

पोलिस अधिक्षक दीक्षीत गेडाम यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना दिले आहे. गायकवाड यांनी त्यासाठी विशेष पथक नियुक्त केले आहे. गुरुवारी एलसीबीचे पथक मिरज विभागात पेट्रोलिंग करीत असताना कुपवाड एमआयडीसीमधील शिवशक्तीनगर येथे झाकीर मुजावर हा बुकीमालक याच्या घरात मटक्याचा हिशेब सुरू असल्याची माहिती मिळाली.

एलसीबीच्या पथकाने मुजावर याच्या घरावर छापा टाकला. यावेळी घरात सहाजण मटका जुगार आकाड्याचे मोबाईलवरून प्रिंट काढून हिशेब करीत असल्याचे आढळून आले. पथकाने त्यांच्याकडून मटक्याच्या चिठ्ठ्या, पेन, पॅड, प्रिंटर, स्कॅनर, १२ मोबाईल, दोन मोटारसायकलीसह ५५ हजार ४०० रुपयांची रोकड असा २ लाख ५८ हजार ९८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बुकीचालकासह सहा जणावर गुन्हा दाखल करून सर्वांना कुपवाड एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक अभिजित सावंत, सुधीर गोरे, इरफान मुल्ला, मुद्दसर पाथरवट, सोहेल कार्तीयानी, दीपक गिड्डे, विकास भोसले, वनीता चव्हाण, प्रियांका धुमाळ, बजरंग शिरतोडे यांनी भाग घेतला.

Web Title: Matkabuki's base destroyed in Kupwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.