मास्कचे दर्जानुसार अधिकतम विक्री मुल्य निश्चित : भांडारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 06:20 PM2020-10-23T18:20:00+5:302020-10-23T18:21:06+5:30

Coronavirus, sanglinews, MaskRate, Food and Drug administration कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून मास्कचा वापर अनिवार्य असून सर्व सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात मास्क उपलब्ध करून देण्यासाठी मास्कची दर्जानुसार (२ प्लाय, ३ प्लाय व एन ९५) महाराष्ट्र राज्यातील अधिकतम विक्री मुल्य महाराष्ट्र शासनाने दिनांक 20 ऑक्टोबर 2020 रोजीच्या शासन निर्णयाव्दारे निश्चित केले आहे.

Maximum selling price fixed according to the quality of the mask: Bhandarkar | मास्कचे दर्जानुसार अधिकतम विक्री मुल्य निश्चित : भांडारकर

मास्कचे दर्जानुसार अधिकतम विक्री मुल्य निश्चित : भांडारकर

googlenewsNext
ठळक मुद्देमास्कचे दर्जानुसार अधिकतम विक्री मुल्य निश्चित : भांडारकरजास्त रक्कम रूग्णांकडून आकारता येणार नाही

सांगली : कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून मास्कचा वापर अनिवार्य असून सर्व सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात मास्क उपलब्ध करून देण्यासाठी मास्कची दर्जानुसार (२ प्लाय, ३ प्लाय व एन ९५) महाराष्ट्र राज्यातील अधिकतम विक्री मुल्य महाराष्ट्र शासनाने दिनांक 20 ऑक्टोबर 2020 रोजीच्या शासन निर्णयाव्दारे निश्चित केले आहे.

संबंधितांनी योग्य त्या किंमतीला मास्क विक्री करावी व शासन आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (औषधे) नि. प. भांडारकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने मास्कच्या दर्जानुसार निश्चित केलेले अधिकतम विक्री मुल्य ((MRP per piece + GST)) रूपयांमध्ये पुढीलप्रमाणे.

(1) NIOSH certified N-95 V Shape (Including Magnum N-95 V Shape mask) –
19 (2) NIOSH certified N-95 3D mask (Including Magnum N-95 MH 3D mask)- 25 (3)
NIOSH certified N-95 without valve (including Venus 14488 V4400-N-95 mask without
valve) - 28 (4) NIOS cetified N-95 cup shape mask without valve (a) Magnum N-95
MH cup – 49 (b) Venus CN95 + N-95 cup shape mask without valve – 29 (c) Venus
713W-N-95-6WE cup style without valve – 37 (d) Venus 723W-N-95-6RE cup style
without valve – 29 (5) FFP2 Mask : ISI certified (including Venus 14491 V-4420 +
FFP2 mask) – 12 (6) 2 Ply surgical with loop or tie – 3 (7) 3 Ply surgical with Melt
Blown (including Benus 14520-3 Ply Mask) – 4 (8) Doctors kit of 5 N-95 masks + 5
3Ply melt blown mask (including Venus doctors kit) – 127.

शासन निर्णयानुसार विविध दर्जाच्या मास्कची विहीत केलेली अधिकतम विक्री मुल्य मर्यादा साथरोग कायदा अंमलात असेपर्यंत लागू राहील. ही मर्यादा राज्यातील सर्व मास्क उत्पादक कंपन्या / वितरक/किरकोळ विक्रेते यांना लागू राहील. सर्व मास्क उत्पादक कंपन्या / वितरक/किरकोळ विक्रेते यांना मास्कचा दर्जा व त्याची निर्धारीत कमाल विक्री किंमत दर्शनी भागावर लावणे आवश्यक राहील. या प्रकरणी काही तक्रार उद्भवल्यास राज्य स्तरावर आयुक्त, अन्न व औषध प्रशासन व जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी हे तक्रार निवारणासाठी सक्षम प्राधिकारी असतील.

रूग्ण सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील शासकीय व खाजगी रूग्णालये/नर्सिंक होम/कोवीड केअर सेंटर/डेडीकेटेउ कोवीड हॉस्पीटल इत्यादी यांना मास्कचा पुरवठा करताना मास्कच्या विहीत अधिकतम विक्री मुल्य मर्यादेच्या 70 टक्के दराने उपलब्ध करून देणे आवश्यक राहील व खाजगी रूग्णालयांनी उपरोक्त दराने मास्कची खरेदी केल्यानंतर खरेदी किंमतीच्या 110 टक्के पेक्षा जास्त रक्कम रूग्णांकडून आकारता येणार नाही, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले असल्याचे  भांडारकर यांनी सांगितले.

Web Title: Maximum selling price fixed according to the quality of the mask: Bhandarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.