जिल्ह्याचे कमाल तापमान ३७ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:26 AM2021-03-26T04:26:38+5:302021-03-26T04:26:38+5:30
सांगली : जिल्ह्याच्या कमाल व किमान तापमानात गुरुवारी अचानक वाढ झाली. त्यामुळे उकाडा वाढला आहे. दरम्यान सांगली शहर व ...
सांगली : जिल्ह्याच्या कमाल व किमान तापमानात गुरुवारी अचानक वाढ झाली. त्यामुळे उकाडा वाढला आहे. दरम्यान सांगली शहर व परिसरात सायंकाळी पाचपासून अंशत: ढगाळ वातावरण होते.
जिल्ह्यात गुरुवारी कमाल तापमान ३७ तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. किमान तापमान सध्या मार्चच्या सरासरीच्या तुलनेत ३ अंशाने अधिक आहे. त्यामुळे रात्रीचा उकाडा अधिक आहे. हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार येत्या तीन दिवसांत कमाल तापमान ३९ अंशापर्यंत तर किमान तापमान २३ अंशापर्यंत वाढणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना उकाडा असह्य होण्याची चिन्हे आहेत. येत्या ३० व ३१ मार्च रोजी तापमानात काहीअंशी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
हवामान खात्याने आठवडाभर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता दोन दिवसांपूर्वी वर्तविली होती. तरीही गुरुवारी सायंकाळी सांगली शहर व परिसरात अंशत: ढगाळ वातावरण होते.