राष्ट्रवादीच्या युवतींनी घातल्या वृद्धांच्या अंगावर मायेच्या शाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:51 AM2020-12-17T04:51:35+5:302020-12-17T04:51:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : इस्लामपूर शहर राष्ट्रवादी युवती संघटनेच्यावतीने राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टा व ...

Maya's shawls on the bodies of old men worn by NCP women | राष्ट्रवादीच्या युवतींनी घातल्या वृद्धांच्या अंगावर मायेच्या शाली

राष्ट्रवादीच्या युवतींनी घातल्या वृद्धांच्या अंगावर मायेच्या शाली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : इस्लामपूर शहर राष्ट्रवादी युवती संघटनेच्यावतीने राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टा व नेर्ले येथील वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिकांना थंडीपासून संरक्षण करत मायेची ऊब देणाऱ्या शाली भेट दिल्या. युवतींच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व वृद्धांनी कौतुक केले.

युवती संघटनेच्या शहराध्यक्षा प्रियांका साळुंखे व त्यांच्या सहकारी युवतींनी नेर्ले येथील शिवशंभो व आष्टा येथील आधार वृध्दाश्रमात भेट देऊन तेथील जेष्ठ नागरिकांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांना शाल भेट दिल्या. यावेळी उपाध्यक्षा सुप्रिया पेठकर, सरचिटणीस मनाली वडार, सचिव ऋतुजा देसाई, सदस्या प्रतीक्षा देसाई, प्रीती डांगे, सायली वडार उपस्थित होत्या. रोझा किणीकर म्हणाल्या, आमचे नेते खासदार शरद पवार यांनी ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या सूत्राने गेली ५०-५५ वर्षे सार्वजनिक क्षेत्रात काम करून राज्य व देशाच्या प्रगतीत योगदान केले आहे. समाजाच्या तळागाळातील घटकांचे अश्रू पुसा, हा त्यांचा आम्हाला संदेश आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवती संघटनेने सामाजिक बांधिलकीतून राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे.

फोटो : फाेटाे : १६ इस्लामपुर २

ओळी : आष्टा येथील वृद्धाश्रमात राष्ट्रवादी युवती संघटनेच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांना शाल भेट देण्यात आली. यावेळी रोझा किणीकर, प्रियांका साळुंखे, सुप्रिया पेठकर, मनाली वडार, ऋतुजा देसाई, प्रतीक्षा देसाई, प्रीती डांगे, सायली वडार उपस्थित होत्या.

Web Title: Maya's shawls on the bodies of old men worn by NCP women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.