सांगलीतील कुपवाडमध्ये महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सुरू; राज्यभरातून ३४ संघ, ५०० खेळाडू सहभागी

By श्रीनिवास नागे | Published: June 2, 2023 01:41 PM2023-06-02T13:41:42+5:302023-06-02T13:42:03+5:30

रविवारपर्यंत रंगणार थरार

Mayor Cup State Level Kabaddi Tournament starts at Kupwad in Sangli | सांगलीतील कुपवाडमध्ये महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सुरू; राज्यभरातून ३४ संघ, ५०० खेळाडू सहभागी

सांगलीतील कुपवाडमध्ये महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सुरू; राज्यभरातून ३४ संघ, ५०० खेळाडू सहभागी

googlenewsNext

कुपवाड : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि महापालिकेच्यावतीने आयोजित निमंत्रित पुरुष व महिला गट महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेस आज, शुक्रवारपासून सुरुवात झाली. शहरातील नवमहाराष्ट्र हायस्कूलच्या क्रीडांगणावर या स्पर्धा सुरू झाल्या असून, कबड्डीचा थरार ४ जूनपर्यंत रंगणार आहे.

राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर पाटील यांच्या हस्ते आणि महापौर दिग्विजय सूर्यवंशी व आयुक्त सुनील पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. 

पुरुष गटात तरुण मराठा (सांगलीवाडी) विरुद्ध जयहिंद (इचलकरंजी), निर्मल (औरंगाबाद) विरुद्ध राकेशभाऊ घुले (पुणे), गुड मॉर्निंग (मुंबई) विरुद्ध जीएम (अहमदनगर), स्वस्तिक (मुंबई) विरुद्ध शिवाजी व्यायाम मंडळ (वाळवा) या संघांत चुरशीचे सामने झाले. महिला गटात एमडी (पुणे) विरुद्ध शिवशक्ती (सांगली), कर्नाळा (पनवेल) विरुद्ध डायनॅमिक (इचलकरंजी), मातोश्री (कोकरुड) विरुद्ध तरुण भारत (सांगली) आणि शिवाजी उदय (सातारा) विरुद्ध महात्मा गांधी (मुंबई) यांच्यात चुरशीने सामने झाले.

सहायक आयुक्त नितीन शिंदे आणि क्रीडाधिकारी महेश पाटील, नकुल जकाते, काका हलवाई यांनी संयोजन केले आहे, तर सुहास व्हटकर समालोचन करत आहेत. उद्घाटन सोहळ्यास जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके, राष्ट्रीय कबड्डीपटू गणेश शेट्टी, अर्जुन पुरस्कारप्राप्त एअर इंडियाचे अधिकारी श्रीराम भावसार, राज्य सरचिटणीस बाबुराव चांदोरे, नगरसेवक विष्णू माने, मनगू सरगर, संतोष पाटील उपस्थित होते.

Web Title: Mayor Cup State Level Kabaddi Tournament starts at Kupwad in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.