‘महापौर चषक’ मंगळवारपासून
By admin | Published: March 10, 2017 12:31 AM2017-03-10T00:31:34+5:302017-03-10T00:31:34+5:30
फुटबॉलचा थरार, विजेत्या संघाला एक लाखाचे बक्षीस, मानाची ट्रॉफी
कोल्हापूर : गेल्या नऊ वर्षांपासून बंद पडलेल्या ‘कोल्हापूर महापौर चषक फुटबॉल’ स्पर्धेचा थरार मंगळवार (दि.१४) पासून करवीरच्या फुटबॉल रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ही स्पर्धा स्थानिक संघांदरम्यान खेळविली जाणार असून रोख रकमेसह मानाच्या ट्रॉफींनी विजेत्या व उपविजेत्या संघांना सन्मानित केले जाणार असल्याची माहिती महापौर हसिना फरास यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
२६ मार्चपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियम येथे खेळवल्या जातील. स्पर्धेत शहरातील १६ नामांकित संघांचा सहभाग असणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने बाद पद्धतीने खेळविले जाणार आहेत. सुरुवातीस पहिले चार दिवस दुपारी दोन व चार वाजता सामने होतील. त्यापुढे सात दिवस मात्र दुपारी चार वाजता एकच सामना खेळविला जाणार आहे. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी विविध समिती स्थापन केल्या आहेत. अशी माहिती महापौर फरास यांनी दिली.
यावेळी उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार, महिला बालकल्याण सभापती वहिदा सौदागर, गटनेता शारंगधर देशमुख, सत्याजित कदम, विजय सूर्यवंशी, नगरसेवक सचिन पाटील, संतोष गायकवाड, राहुल माने, विजय खाडे पाटील आदी उपस्थित होते.
अशी असतील बक्षिसे
विजेता : १ लाख रुपये व ट्रॉफी
उपविजेता : ५0 हजार रु. व ट्रॉफी
तृतीय क्रमांक : १५ हजार रुपये
चतुर्थ क्रमांक : १0 हजार रुपये
वैयक्तिक बक्षिसे
गोलकिपर : ५ हजार रु. व ट्रॉफी
डिफेन्स : ५ हजार रुपये व ट्रॉफी
हाफ : ५ हजार रु. व ट्रॉफी
फॉरवर्ड : ५ हजार रु. व ट्रॉफी
संपूर्ण स्पर्धेतील उत्कृ ष्ट खेळाडू - दहा हजार रुपये व ट्रॉफी