आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पगार महापौरांनी रोखले
By admin | Published: November 6, 2015 11:52 PM2015-11-06T23:52:08+5:302015-11-06T23:55:54+5:30
शहरातील आरोग्य, स्वच्छता व कचरा उठावप्रकरणी हलगर्जीपणा केल्याबद्दल झाडाझडती घेतली
सांगली : शहरातील आरोग्य, स्वच्छता व कचरा उठावप्रकरणी हलगर्जीपणा केल्याबद्दल शुक्रवारी महापौर विवेक कांबळे यांनी आरोग्य विभागाची झाडाझडती घेतली. स्वच्छता नीट होत नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार रोखण्याचे आदेशही त्यांनी दिले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आरोग्य विभागाची बैठक झाली. या बैठकीत महापौर कांबळे यांनी आरोग्य विभागाला चांगलेच फैलावर घेतले. शहरात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचे आदेश देत ते म्हणाले की, या कारवाईचा अहवाल दररोज महापौर कार्यालयाकडे द्यावा. हॉटेल व्यावसायिक, फेरीवाले यांनी अस्वच्छता केल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी. विविध परवान्यांचे अधिकार स्वच्छता निरीक्षकांकडून सहायक आयुक्तांकडे वर्ग करण्याची सूचनाही त्यांनी दिली.
शहरातील एकूण ५९ कंटेनर दुरुस्तीसाठी देण्यात आले आहेत. त्यापैकी ४२ कंटनेर दुरुस्त होऊ शकत नाहीत. त्याचा अहवाल आयुक्तांना सादर करण्याचे आदेशही महापौर कांबळे यांनी आरोग्य विभागाला दिले. (प्रतिनिधी)