महापौरांकडून अंदाजपत्रकात निधीची खैरात

By admin | Published: May 12, 2017 12:05 AM2017-05-12T00:05:22+5:302017-05-12T00:05:22+5:30

महापौरांकडून अंदाजपत्रकात निधीची खैरात

Mayor's budget funding budget | महापौरांकडून अंदाजपत्रकात निधीची खैरात

महापौरांकडून अंदाजपत्रकात निधीची खैरात

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वर्षभराने होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महापौर हारुण शिकलगार यांनी अंदाजपत्रकात कोट्यवधींच्या निधीची खैरात केली आहे. स्थायी समितीच्या काही कामांना कात्री लावतानाच नगरसेवक, प्रभाग समितीच्या विकास निधीत भरीव वाढ केल्याने महापालिकेचे अंदाजपत्रक ६८० कोटींच्या घरात पोहोचले आहे. विकासापासून वंचित असलेल्या कुपवाडकरांना मात्र अंदाजपत्रकातून दिलासा देताना १८.५० कोटींचे विशेष पॅकेजही दिले आहे.
महापौर शिकलगार यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत महापालिकेच्या अंदाजपत्रकावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले. महापालिका प्रशासनाने ५७९ कोटींचे अंदाजपत्रक तयार केले होते. त्यात स्थायी समितीने ६४ कोटींची वाढ करीत ते ६४३ कोटींवर नेले. आता महापौरांनी त्यात आणखी ४५ ते ५० कोटींची भर घातली. स्थायी समितीने तब्बल ६६ कोटी रुपयांच्या बायनेम कामांची तरतूद अंदाजपत्रकात केली होती. त्याला मात्र महापौरांनी कात्री लावली आहे. त्याऐवजी नगरसेवक व प्रभाग समितीच्या विकास निधीत वाढ केली आहे.
मध्यंतरी कुपवाडकरांनी महापौर शिकलगार व आयुक्त खेबुडकर यांची भेट घेऊन, विकासकामासाठी निधीची मागणी केली होती. त्याची दखल महापौरांनी या अंदाजपत्रकात घेत, कुपवाडकरांना १० कोटींचे विशेष पॅकेज व कुपवाडच्या १७ नगरसेवकांना प्रत्येकी ५० लाख, अशा साडेआठ कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. सांगलीतील शामरावनगर, कोल्हापूर रोड, गव्हर्न्मेंट कॉलनी, समतानगर, दत्तनगर, हनुमाननगर, रामकृष्णनगर, इस्लामपूर बायपास रस्ता या विस्तारित भागातील पायाभूत सुविधांसाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
सांगलीचा वाढता विस्तार विचारात घेऊन हिराबाग वॉटर वर्क्स येथील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविली जाणार आहे. सध्या येथे १६ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. त्याची क्षमता आणखी १४ एमएलडीने वाढविण्यासाठी साडेचार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. झुलेलाल चौक ते शंभरफुटी रस्ता व कत्तलखाना रस्त्यावरील गटारीसाठी अनुक्रमे ५० व ६० लाख रुपये धरण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणावर आतापर्यंत ३० लाख रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित फरशी व इतर कामासाठी २० लाखांची तरतूद केली आहे. पुष्पराज चौक ते विश्रामबाग चौकापर्यंत एलईडी दिवे बसविणे, बांधकाम मजुरांसाठी निवारा शेड, चौक सुशोभीकरण आदी कामांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: Mayor's budget funding budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.