Sangli News: हमीद इराणी, माउली जमदाडेची झुंज अखेर बराेबरीत, तब्बल एक तास चाललेली कुस्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 06:57 PM2023-03-20T18:57:27+5:302023-03-20T18:57:51+5:30
कुस्ती शाैकीनांची चांगलीच निराशा
सांगली : पैलवान हरिनाना पवार व बिजलीमल्ल संभाजी पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयाेजित महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात पहिल्या क्रमांकाची कुस्ती माउली कोकाटे (हनुमान आखाडा, पुणे) विरुद्ध इराणचा हमीद इराणी यांची कुस्ती बराेबरीत सुटली.
कृष्णा काठावरील सरकारी घाटावर रविवारी महापौर चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारत विरुद्ध इराण असा सामना पाहायला मिळणार असल्याने कुस्ती शौकिनांची मोठी गर्दी होती. पुण्यातील हनुमान आखाड्याचा माऊली कोकाटे व इराणचा हमीद इराणी यांच्यामध्ये पहिल्या क्रमांकासाठी भारत विरुद्ध इराण अशी कुस्ती रंगली. तब्बल एक तास चाललेली कुस्ती रटाळ कुस्ती अखेर बरोबरीत सोडविण्यात आली. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्त्या देखील रटाळ झाल्याने बरोबरीत सोडविण्यात आल्याने कुस्ती शाैकीनांची चांगलीच निराशा झाली.
सांगली येथील आयर्विन पुलाजवळील सरकारी घाटावरील कुस्ती मैदानावर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका व विजयंत मंडळ यांच्या विद्यमाने वज्रदेही हरीनाना पवार व बिजलीमल्ल संभाजी पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त महापौर चषक कुस्ती मैदान आयाेजित करण्यात आले हाेते. महापौर चषक कुस्ती स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष होते.
कृष्णाकाठावरील सरकारी घाट परिसरात सुमारे सात तास हे मैदान रंगले. मैदानात लहानमोठ्या शंभर कुस्त्या झाल्या. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, खा. संजय पाटील यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली. प्रारंभी माऊली कोकाटे याने हमीद इराणी याच्याशी खडाखडी करुन ताकदीचा अंदाज घेतला. मात्र, दोनही पैलवान तुल्यबळ असल्याने एकमेकांना झटापट करत वेळ घालवत होते. दोघांमध्ये तब्बल एक तास रटाळ कुस्ती रंगली. यामुळे मैदानास जमलेल्या हजारो शौकिनांची निराशा झाली. अखेर पंच कमिटीने हस्तक्षेप करत कुस्ती बरोबरीत सोडवली.