रॉयल युथ फाउण्डेशनतर्फे काेराेनाबाधित रुग्णांना जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:28 AM2021-05-06T04:28:28+5:302021-05-06T04:28:28+5:30
सांगली : रॉयल्स युथ फाउण्डेशन व मावळा प्रतिष्ठानतर्फे उद्योजक समीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहरामध्ये कोरोनामुळे रुग्णालयात उपचार घेत ...
सांगली : रॉयल्स युथ फाउण्डेशन व मावळा प्रतिष्ठानतर्फे उद्योजक समीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहरामध्ये कोरोनामुळे रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या रुग्णांसाठी मोफत जेवण पोहोचवण्यात येत आहे. बुधवारपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला.
चपाती, भाजी, आमटी, जिरा राइस व दाेन अंडी असे जेवण रुग्णांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. बुधवारी सांगली, मिरज व कुपवाड शहरात बाहेर गावावरून आलेल्या ६५ रुग्णांना जेवण पोहोचविण्यात आले.
याशिवाय कोरोनाबाधित रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्याचे तसेच रक्त व प्लाझ्मा मिळवून देण्याचे कामही प्रतिष्ठानचे कार्यकर्ते करत आहेत.
या सर्व कार्यात रॉयल्स युथ फाउण्डेशन व मावळा प्रतिष्ठानची हेल्थ टीम कार्यरत आहे. यामध्ये सुहेल तांबोळी, अक्षय सावंत, उमेश भगत, हर्षल पाटील, प्रशिल तासगावकर, अनिकेत डोंबळे, मयूरेश कोळेकर, गणेश देसाई, जुनेद जमादार सहभागी आहेत.