विलगीकरण केंद्रातील रुग्णांना पालिकेच्या अधिकाऱ्याकडून भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:21 AM2021-06-04T04:21:03+5:302021-06-04T04:21:03+5:30

आष्टा : येथील विलासराव शिंदे विलगीकरण केंद्र या ठिकाणी विलगीकरण कक्षात सुमारे १७ रुग्ण आहेत. या ठिकाणी ...

Meals from the municipal officer to the patients in the segregation center | विलगीकरण केंद्रातील रुग्णांना पालिकेच्या अधिकाऱ्याकडून भोजन

विलगीकरण केंद्रातील रुग्णांना पालिकेच्या अधिकाऱ्याकडून भोजन

Next

आष्टा : येथील विलासराव शिंदे विलगीकरण केंद्र या ठिकाणी विलगीकरण कक्षात सुमारे १७ रुग्ण आहेत. या ठिकाणी असलेल्या रुग्णांना समाजातील विविध मान्यवर मदत करत आहेत. यामध्ये पालिकेच्या पाणी पुरवठा अधिकारी आसावरी सुतार यांनी रुग्णांना भोजन देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

यावेळी नगराध्यक्षा स्नेहा माळी, आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण आदींच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. येथील रुग्णांना चहा व अल्पोपाहार विलासराव शिंदे फौंडेशन व शिवाजीराव पाटील आप्पा पत संस्था देत आहे. मात्र रुग्णांना घरचेच जेवण घ्यावे लागते. या रुग्णांना आसावरी सुतार यांनी स्वतः तयार केलेले भोजन देऊन माणुसकी धर्म जोपासला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Meals from the municipal officer to the patients in the segregation center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.