आमदार फंडातून रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:26 AM2021-05-11T04:26:50+5:302021-05-11T04:26:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खानापूर मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांना वैद्यकीय उपकरणांची आवश्यकता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खानापूर मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांना वैद्यकीय उपकरणांची आवश्यकता आहे. यामुळे आमदार फंडातून विटा, करंजे (भिवघाट) व आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयांसह खानापूर, आटपाडी व विसापूर सर्कलमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांना वैद्यकीय उपकरणासाठी निधी देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली असल्याची माहिती आ. अनिल बाबर यांनी दिली.
आमदार बाबर म्हणाले की, विटा ग्रामीण रुग्णालयासाठी १० ऑक्सिजन कॉन्स्टेरेटर मशीन, १० मल्टी पारा मॉनिटर, १ संगणक व १ इलेक्ट्रीक जनरेटर, करंजे (भिवघाट) ग्रामीण रुग्णालयासाठी १० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेक्टर मशीन, १० मल्टी पारा मॉनिटर व एक इलेक्ट्रीक जनरेटर, तसेच आटपाडी ग्रामीण रुग्णालयासाठी ऑक्सिजन कॉन्स्टेक्टर मशीन व मल्टी पारा मॉनिटर प्रत्येकी पाच आणि एक इलेक्ट्रीक जनरेटरसाठी आमदार फंडातून निधी देण्यात येणार आहे.
तसेच विटा, वेजेगाव, लेंगरे, खानापूर, आटपाडी, दिघंची, करगणी, खरसुंडी, मांजर्डे, बोरगाव व हातनूर या ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ३७ ऑक्सिजन कॉन्स्ट्रेक्टर मशीन व २४ मल्टी पारा मॉनिटरसाठी आमदार फंडातून प्रशासकीय मान्यता देऊन निधी मंजूर करून द्यावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली असल्याचे आ. अनिल बाबर यांनी सांगितले.