कवठेमहांकाळ, जत, उमदी पोलीस ठाण्यांतील १० गावांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:27 AM2021-05-26T04:27:53+5:302021-05-26T04:27:53+5:30
संख : पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या अनुषंगाने जत उपविभागातील कवठेमहांकाळ, जत, उमदी पोलीस ठाण्यांतील ...
संख : पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या अनुषंगाने जत उपविभागातील कवठेमहांकाळ, जत, उमदी पोलीस ठाण्यांतील १० गावांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन सूचना दिल्या. उमदी, माडग्याळ, जाडरबोबलाद, कुणीकोणुर, उमराणी, बिळूर, डफळापूर, हिंगणगाव, कोंगनोळी, रांजणी गावांचे ग्रामसमिती सदस्य उपस्थित होते.
बैठकीत गावातील ग्रामदक्षता समितीला गावामध्ये जास्तीत जास्त जनजागृतीबाबत तसेच रुग्णांना घरामध्ये न ठेवता गावातील शाळेमध्ये (कम्युनिटी क्वारंटाईन) ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले. बाहेरून ये-जा करणाऱ्यांवर जास्त लक्ष ठेवणे, विनाकारण गर्दी होऊ न देणे, लसीकरण केंद्रावरही योग्य नियोजन करावे यासाठी सर्व समित्यांनी अधिक सतर्कतेने समितीने काम करावे, आदी सूचना दिल्या. सरपंच, तलाठी, ग्रामसेवक व इतर सदस्य हजर होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, उपनिरीक्षक अल्लाबक्ष सय्यद, नामदेव दांडगे यांच्या उपस्थितील बैठक झाली.