साळशिंगेमध्ये अंगणवाडीसेविकांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:30 AM2021-09-24T04:30:50+5:302021-09-24T04:30:50+5:30
लेगरे : एकात्मिक बालविकास सेवा योजनेतंर्गत साळशिंगे ता. ...
लेगरे : एकात्मिक बालविकास सेवा योजनेतंर्गत साळशिंगे ता. खानापूर येथे अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा मेळावा झाला. लेगरे येथील अंगणवाडीसेविका व मदतनीसही या मेळाव्यात हजर होत्या. उद्घाटन पंचायत समिती सदस्या कविता देवकर यांच्या हस्ते झाले. सकस व पौष्टिक आहाराचे प्रदर्शनही होते.
बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती पी. एन. पटेल यांनी पोषण आहाराबाबत मार्गदर्शन केले. अंगणवाडी सेविका यांनी गंभीर आजारी बालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर तत्काळ उपचार करावेत, असे आवाहन केले. या वेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, अंगणवाडीसेविका, मदतनीस व पालक उपस्थित होते. अंगणवाडी पर्यवेक्षिका निर्मला परचाके यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते.