जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 04:40 PM2019-09-13T16:40:07+5:302019-09-13T16:44:44+5:30
सांगली जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विवेक आगवणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
सांगली : जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विवेक आगवणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
यावेळी जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले, उपविभागीय पोलीस अधिकारी विटा अंकुश इंगळे, समितीचे अशासकीय सदस्य सुरेश दुधगावकर, संदेश भंडारे आदि उपस्थित होते.
उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विवेक आगवणे यांनी जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांचा प्रकरणनिहाय आढावा घेतला. यावेळी त्यांनी पोलीस विभागाकडे दाखल झालेल्या आणि निपटारा करण्यात आलेल्या प्रकरणाबाबत प्रकरणनिहाय आढावा घेतला.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 च्या कायद्यांतर्गत दाखल होणाऱ्या प्रकरणांमध्ये विहीत मुदतीत आरोपपत्र दाखल करावे, जातीच्या दाखल्याअभावी प्रकरणे प्रलंबित राहू नयेत, न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे याबाबत संबंधितांनी पाठपुरावा करून प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत या बैठकीत निर्देश देण्यात आले.प्रारंभी सहायक आयुक्त सचिन कवले यांनी मागील बैठकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली.