शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी गुरुवारी कोल्हापुरात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:28 AM2021-02-24T04:28:41+5:302021-02-24T04:28:41+5:30
सूर्यवंशी म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी तत्कालीन समितीने जागा पहाणी करून शिफारस केली होती. परंतु, हे उपकेंद्र ...
सूर्यवंशी म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी तत्कालीन समितीने जागा पहाणी करून शिफारस केली होती. परंतु, हे उपकेंद्र अन्यत्र हलविण्यासाठी राजकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यामुळे खानापूर परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.
त्यासाठी अखिल भारतीय किसानसभेने पुढाकार घेऊन संघर्ष सुरू ठेवला आहे. खानापूर येथे उपकेंद्र होईपर्यंत किसानसभा पाठपुरावा करणार आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरून जनआंदोलनाची तयारीही किसानसभेने केली आहे. दि. २४ जानेवारीला खानापूर येथे सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत उपकेंद्र खानापूरलाच झाले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. त्यापार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. शिर्के यांनी गुरुवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता किसान सभेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. त्यामुळे या बैठकीत खानापूर उपकेंद्राची मागणी ताकदीने करणार आहे.
यावेळी किसानसभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. उमेश देशमुख, जिल्हा सरचिटणीस कॉ. दिगंबर कांबळे, सुनील हसबे, सचिन जाधव, दौलत भगत आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.