क्रांतिवीर बर्डे गुरुजींच्या स्मृती युवा पिढीस प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:25 AM2021-09-13T04:25:45+5:302021-09-13T04:25:45+5:30

वाटेगाव : क्रांतिवीर देशभक्त बर्डे गुरुजींचे स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान होते. स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधीजींच्या विचाराने स्वतःला झोकून देऊन ...

The memory of Krantiveer Barde Guruji inspires the younger generation | क्रांतिवीर बर्डे गुरुजींच्या स्मृती युवा पिढीस प्रेरणादायी

क्रांतिवीर बर्डे गुरुजींच्या स्मृती युवा पिढीस प्रेरणादायी

Next

वाटेगाव : क्रांतिवीर देशभक्त बर्डे गुरुजींचे स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान होते. स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधीजींच्या विचाराने स्वतःला झोकून देऊन त्यांनी संपूर्ण आयुष्य देशहितासाठी अर्पण केले. त्यांच्या स्मृती युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

वाटेगाव (ता. वाळवा) येथे बर्डे गुरुजींच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब मुळीक, वाळवा तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष विजय पाटील, चिमणभाऊ डांगे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने, प्रांताधिकारी संपत खिलारी, तहसीलदार रवींद्र सबनीस, डॉ. नरसिंह पाटील, ग. चि. ठोंबरे, के. डी पाटील, मनीष बर्डे, प्रशांत बर्डे, प्रदीप चव्हाण, उपसरपंच शुभांगी पाटील, धनाजी ठोंबरे, आदी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिवीर बर्डे गुरुजी व त्यांच्या पत्नी क्रांतिवीरांगना विजया बर्डे यांच्या तैलचित्राचे अनावरण तसेच पहिल्या मजल्यावरील नूतन सभागृहाचे उद्घाटन व कोनशिला उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

जयंत पाटील म्हणाले, आज वागण्याचे, लिहिण्याचे, बोलण्याचे स्वातंत्र्य ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी मिळवून दिले, त्यांच्या स्मृती जपण्याचे काम युवा पिढीने करावे. बर्डे गुरुजींचे स्मारक व पुतळा त्यांचे अलौकिक कार्य येणाऱ्या पिढीला प्रेरणा देत राहील.

मानसिंगराव नाईक म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांचे राज्यस्तरीय स्मारक शिराळा तालुक्यात उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी व जागा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करू.

रवींद्र बर्डे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. हरिश्चंद्र औताडे यांनी स्वागत केले. सतपाल ढेबे यांनी आभार मानले. यावेळी जयकर पाटील, सर्जेराव पवार, सुभाष पाटील, नंदकुमार पाटील, प्रवीण शेटे, किसन जानकर, मंजूषा पाटील, कुंदाताई पाटील, राजाभाऊ कुलकर्णी, शिल्पकार विजय गुजर, शुभदा वाईकर उपस्थित होते.

फोटो : १२ वाटेगाव १

ओळी : वाटेगाव (ता. वाळवा) येथे क्रांतिवीर बर्डे गुरुजी यांच्या पुतळ्याचे अनावरण जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, रवींद्र बर्डे, बाबासाहेब मुळीक, के. डी. पाटील उपस्थित हाेते.

Web Title: The memory of Krantiveer Barde Guruji inspires the younger generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.