महिलांच्या त्यागाचा पुरुषांनी सन्मान करावा
By admin | Published: March 10, 2016 12:03 AM2016-03-10T00:03:04+5:302016-03-10T01:19:59+5:30
एकनाथ पाटील : ‘सॅलरी अर्नर्स’तर्फे आदर्श मातांचा सांगलीत गौरव
सांगली : महिलांच्या त्यागाचा पुरुषांनी सन्मान करावा व प्रत्येक गोष्टीत महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने काम करावे, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे माजी प्रधान सचिव एकनाथ पाटील यांनी केले. सांगली सॅलरी अर्नर्स को-आॅप. सोसायटी लि., सांगली या संस्थेने महिला दिनानामित्त आयोजित ‘सॅलरी आदर्श माता पुरस्कार’ वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
ते म्हणाले की, महिलांनी आत्मभान जागृत ठेवणे गरजेचे आहे. स्वागत संस्थेचे अध्यक्ष लालासाहेब मोरे यांनी करून, ‘आदर्श माता पुरस्कार’ ‘सॅलरी’मार्फत देण्याची भूमिका विषद केली. यावेळी ‘सॅलरी’तर्फे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ११ मातांचा गौरव करण्यात आला. यामध्ये हौसाबाई पाटील, कमरुनिस्सा अन्सारी, सौ. कांचन सुर्वे, सौ. शहनाज मुजावर, सौ. जिजाबाई पांढरे, सौ. मालन मोरे, श्रीमती इंदुबाई पाटील, सौ. मंगल मुळीक, सौ. मंजुळा साळे, श्रीमती अनुसया ढाले, सौ. राधाबाई कचरे, सौ. सुजाता सूर्यवंशी, श्रीमती सुवर्णा जाधव यांचा समावेश आहे. कोकण खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी व उपजिल्हाधिकारी सुचिता भिकाणे यांनीही विचार मांडले.
यावेळी अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, हणमंत गुणाले, जे. के. महाडिक, मिरज पंचायत समितीच्या नूतन सभापती जयश्री पाटील, जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक सी. बी. पाटील, कार्यकारी अभियंता तानाजी सूर्यवंशी, नाडे, संगीता हारगे, तसेच संचालक प्रदीप कदम, शरद पाटील, अनिल पाटील, अभिमन्यू मासाळ, रामचंद्र महाडिक, झाकीरहुसेन चौगुले उपस्थित होते. परिचय उपाध्यक्ष पी. एन. काळे यांनी करून दिला, तर आभार संस्थेचे संचालकशरद पाटील यांनी मानले. (प्रतिनिधी)