सांगली जिल्ह्याचा पारा ४१ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 07:08 PM2019-05-18T19:08:04+5:302019-05-18T19:12:08+5:30

मे महिन्याचा पहिला पंधरवडा दिलासादायक गेला असला तरी, शेवटचा पंधरवडा त्रासदायी ठरण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्याचे कमाल तापमान शनिवारी ४१ अंश सेल्सिअस नोंदले असून, यात आणखी अंशाने वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.

The mercury of Sangli district is 41 degrees | सांगली जिल्ह्याचा पारा ४१ अंशावर

सांगली जिल्ह्याचा पारा ४१ अंशावर

Next
ठळक मुद्देढगाळ वातावरणाचा अंदाज : शेवटचा पंधरवडा झळांमुळे असह

सांगली : मे महिन्याचा पहिला पंधरवडा दिलासादायक गेला असला तरी, शेवटचा पंधरवडा त्रासदायी ठरण्याची चिन्हे आहेत.  जिल्ह्याचे कमाल तापमान शनिवारी ४१ अंश सेल्सिअस नोंदले असून, यात आणखी अंशाने वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.
 जिल्ह्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाने उच्चांकी मजल मारली होती. अस' झालेल्या उन्हाच्या झळा मे महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांत कमी झाल्या, मात्र आता पुन्हा त्या विक्रमाच्या दिशेने धावू लागल्या आहेत. किमान तापमानातही वाढ होत असल्याने रात्रीच्या उकाड्यानेही नागरिक हैराण झाले आहेत. शनिवारी किमान तापमान २१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार २० व २१ मे रोजी जिल्'ाचे सरासरी कमाल तापमान ४२ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. २२ ते २४ मे या काळात किमान तापमान २२ अंशावर जाणार आहे. त्यामुळे चालू पंधरवडा उन्हाच्या तीव्रतेचा असणार आहे. रविवारी व सोमवारी  जिल्ह्याच्या काही भागात हवामान ढगाळ राहणार असून, पावसाची कोणतीही शक्यता हवामान खात्याने वर्तविलेली नाही.

 

Web Title: The mercury of Sangli district is 41 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.