मिरजेत प्रेमप्रकरणातून प्रेमीयुगुलाने गळफास घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:25 AM2021-03-20T04:25:12+5:302021-03-20T04:25:12+5:30

मिरज : मिरजेत प्रेम प्रकरणातून नागेश गणपती चव्हाण (वय १९, रा. कृष्णाघाट रस्ता, मिरज) या तरुणाने गळफास घेऊन ...

Merijet fell in love with Prem Yugula | मिरजेत प्रेमप्रकरणातून प्रेमीयुगुलाने गळफास घेतला

मिरजेत प्रेमप्रकरणातून प्रेमीयुगुलाने गळफास घेतला

Next

मिरज : मिरजेत प्रेम प्रकरणातून नागेश गणपती चव्हाण (वय १९, रा. कृष्णाघाट रस्ता, मिरज) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नागेशच्या आत्महत्येचे वृत्त समजताच विवाहित प्रेमिकेनेही गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, प्रेमिका बचावली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. शुक्रवारी दुपारी ४ वाजता ही घटना घडली.

नागेश याचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. यातून दोघांनी महिनाभरापूर्वी पलायन केले होते. याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. नागेश याच्या कुटुंबीयांनी पोलिसांसोबत बंगळुरू येथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले होते. मात्र, नागेश याने पुन्हा पलायन केल्याने त्यास बुधवारी बंगळुरू येथून मिरजेत आणण्यात आले. प्रेमप्रकरणातून दोन्ही कुटुंबात तणाव वाढल्याने प्रकरण मिटविण्यासाठी दोन्ही कुटुंबांनी जात पंचायतीकडे तक्रार केली होती. मात्र, जात पंचायतीने ‘पोलिसांत तक्रार देऊन आमच्याकडे या’ असे सांगितले होते. दरम्यान, पोलिसांत व जात पंचायतीमध्ये प्रकरण गेल्याने नागेश चव्हाण याने शुक्रवारी दुपारी ४ वाजता राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समजताच संबंधित विवाहितेनेही आपल्या घराच्या पाठीमागे जाऊन गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तिला वाचवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत गांधी चौक पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Merijet fell in love with Prem Yugula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.