म्हैसाळ भ्रुणहत्याप्रकरणी आणखी एकाला अटक

By admin | Published: March 15, 2017 03:37 PM2017-03-15T15:37:33+5:302017-03-15T15:37:33+5:30

गर्भपाताशी संबंधित औषधे कृष्णा नदीत फेकून दिल्याचेही निष्पन्न

Mhasal Another person was arrested for the role of an embryo | म्हैसाळ भ्रुणहत्याप्रकरणी आणखी एकाला अटक

म्हैसाळ भ्रुणहत्याप्रकरणी आणखी एकाला अटक

Next

म्हैसाळ भ्रुणहत्याप्रकरणी आणखी एकाला अटक
सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रुण हत्याप्रकरणात बुधवारी मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याला औषध पुरविणाऱ्या भरत नावाच्या आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. तो मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील असून सध्या सांगलीतील बसस्थानक परिसरात रहात होता. दरम्यान, खिद्रापुरे याने रुग्णालयातील गर्भपाताशी संबंधित औषधे कृष्णा नदीत फेकून दिल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
म्हैसाळ भ्रुण हत्या प्रकरणाची व्याप्ती दिवसेदिवस वाढत चालली आहे. आतापर्यंत या प्रकरणात मुख्य संशयित खिद्रापुरे याच्यासह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. यात दोन डॉक्टर, चार एजंट, नर्स, कंपाऊंडर, औषध पुरवठा करणाऱ्या इसमाचा समावेश आहे. मणेराजुरीतील विवाहिता स्वाती जमदाडे हिचा गर्भपातावेळी मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. तिच्या पती प्रविण जमदाडे यालाही अटक झाली आहे. त्याच्याकडून बुधवारी मोटारसायकल जप्त करण्यात आली.
भ्रुणहत्येचे प्रकरण समोर येताच खिद्रापुरे गायब झाला होता. फरारी होताना त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील औरवाड परिसरात रुग्णालयातील गर्भपाताशी संबंधित औषधे फेकल्याची कबुली दिली आहे. खिद्रापुरे याला औषध पुरविणाऱ्या आणखी एकाचे नाव समोर आले असून त्याला अटक करण्यात आली. अटक केलेल्यांची संख्या बारा झाली आहे. भरत हा मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील असून सध्या तो सांगलीत राहतो. त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Mhasal Another person was arrested for the role of an embryo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.