सिध्देवाडी परिसरातील एम.आय.डी.सी. रद्द होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 03:29 PM2019-07-11T15:29:30+5:302019-07-11T15:36:32+5:30
मिरज येथील सिध्देवाडी येथील शासनाने प्रस्तावित केलेल्या 185 एकर जमिनीवरील औद्योगिक वसाहत रद्द करण्याचे प्रस्तावित असून याबाबत शासनस्तरावरुन लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी दिली.
मिरज : मिरज येथील सिध्देवाडी येथील शासनाने प्रस्तावित केलेल्या 185 एकर जमिनीवरील औद्योगिक वसाहत रद्द करण्याचे प्रस्तावित असून याबाबत शासनस्तरावरुन लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी दिली.
शासनाने मिरज तालुक्यातील भोसे व सिध्देवाडी या दोन गावातील सुमारे १८५ एकर जमीन औद्योगिक वसाहतीसाठी राखीव ठेवण्यासाठी शासनाने सन 2011 पासून निर्देशित केले होते. परंतू पुढील काळात जमीन संपादनाबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
सध्या या भागात म्हैसाळ या कालव्याचे काम जोरात सुरु असून या पाण्याचा उपयोग या भागातील पडीक जमिनी बागायत किंवा फळबाग लागवडीखाली येण्यास मदत होणार आहे. बरीच वर्षे पाण्यापासून वंचित असणारा हा भागा आता पाण्याखाली येणार आहे. या भागातील प्रस्तावित ही औद्योगिक वसाहत रद्द करावी असा ठराव ग्रामपंचायतीने पास करुन शासनास कळविले होते.
या संदर्भात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस राज्याचे सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे तसेच एम.आय.डी.सी. अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री खाडे म्हणाले, शासनाच्या विचाराधीन असलेल्या या एम.आय.डी.सी. बाबत ग्रामपंचायतीने जो ठराव पास केला आहे, त्याबाबत शासन सकारात्मक असून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.या भागातील आमदार म्हणून शासनाकडे सतत या बाबत पाठपुरावा केला होता.
या निर्णयामुळे या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे याबद्दल मुख्खमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई याचे अभार मानले या बैठकीत सुभाष देसाई यांनी निर्देश दिले आहेत की या भागातील सर्वे लवकर करून याची मागणी मान्य करण्याबाबत त्वरीत कारवाई करावी.