सैन्य दिवस : शाैर्याची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:22 AM2021-01-15T04:22:42+5:302021-01-15T04:22:42+5:30

भारतीय सैन्याच्या बलिदानाचे आणि शौर्याचे कौतुक करण्याचा हा दिवस आहे. सैन्याप्रति मनात आदरभाव ठेवत देशभर हा दिवस साजरा केला ...

Military Day: The tradition of poetry | सैन्य दिवस : शाैर्याची परंपरा

सैन्य दिवस : शाैर्याची परंपरा

Next

भारतीय सैन्याच्या बलिदानाचे आणि शौर्याचे कौतुक करण्याचा हा दिवस आहे. सैन्याप्रति मनात आदरभाव ठेवत देशभर हा दिवस साजरा केला जातो. सैन्य दिनानिमित्त आपण भारतीय लष्कराच्या काही खास बाबी जाणून घेऊया.

भारतीय सैन्याची स्थापना कोलकाता येथे १७७६ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने सरकारच्या अधीन राहून केली. भारतीय सैन्याच्या ५३ छावण्या आणि नऊ सैन्यतळ आहेत. भारतीय सैन्यात सैनिक आपल्या इच्छेने सहभागी होतात. सर्वात उंच युद्धभूमी भारतातील सियाचीन ग्लेशियल हे जगातील सर्वात उंच रणमैदान आहे. समुद्रसपाटीपासून हे मैदान तब्बल पाच हजार मीटर उंचीवर आहे.

आसाम रायफल ही देशातील सर्वात जुनी पॅरामिलिट्री फोर्स आहे. तिची स्थापना १८३५ मध्ये झाली. या फोर्सने सर्वाधिक संख्येने युद्धबंदी बनवले होते. भारत-पाकिस्तान यांच्यातील १९७१ च्या युद्धावेळी पाकिस्तानी सैन्याचे जवळपास ९३ हजार सैनिक आणि अधिकाऱ्यांनी आत्मसमर्पण केले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर ताब्यात घेतलेल्या युद्धबंधकांची ही संख्या सर्वाधिक आहे.

जगातील सर्वात उंच पूल बेल हा आहे. हिमाचल प्रदेशमधील द्रास आणि सुरू नदीच्या मध्यभागी लद्दाखच्या पर्वतरांगांमध्ये हा पूल आहे. १९८२ मध्ये भारतीय सैन्याने तो बांधला आहे.

तजाकिस्तान येथे भारतीय वायुसेनेचा एक आऊट स्टेशन तळ आहे, तर दुसरा बेस अफगाणिस्तान येथे बनविण्याचा विचार भारतीय वायूसेना करत आहे.

भारतीय सैन्याकडे एक घोडेस्वार रेजिमेंट आहे. जगभरात अशा प्रकारच्या केवळ तीनच रेजिमेंट शिल्लक राहिल्या आहेत. ज्यामध्ये एक भारतीय आहे.

भारतीय नौसेना अकॅडमी, केरळमधील एझिमाला येथे आहे. आशियातील ही भारतीय प्रकारातील सर्वात मोठी नौसेना अकॅडमी आहे.

तसेच डायरेक्टोरेट ऑफ मिलिट्री इंटेलिजन्स नावाने भारतीय सैन्याची गुप्तचर यंत्रणा काम करते. १९४१मध्ये याची स्थापना झाली आहे. सैन्यदलातील भ्रष्टाचार आणि सीमारेषेवर गुप्त माहिती मिळविण्यासाठी हा विभाग काम करतो.

Web Title: Military Day: The tradition of poetry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.