सांगलीतील आटपाडी तालुक्यात दूध भेसळ, अन्न व औषध प्रशासनाची छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 11:44 AM2023-09-14T11:44:26+5:302023-09-14T11:45:40+5:30

लक्ष्मण सरगर आटपाडी : आटपाडी तालुक्यात दूध भेसळ करणाऱ्यावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आज, गुरुवारी ...

Milk adulteration food and drug administration raid in Atpadi taluka of Sangli | सांगलीतील आटपाडी तालुक्यात दूध भेसळ, अन्न व औषध प्रशासनाची छापेमारी

सांगलीतील आटपाडी तालुक्यात दूध भेसळ, अन्न व औषध प्रशासनाची छापेमारी

googlenewsNext

लक्ष्मण सरगर

आटपाडी : आटपाडी तालुक्यात दूध भेसळ करणाऱ्यावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आज, गुरुवारी सकाळपासून चार पथकांच्या माध्यमातून विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. याकारवाईमुळे दूध भेसळीचा गोरखधंदा करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.

गेल्या चार ते पाच महिन्यापासून आटपाडी तालुक्यामध्ये दूध भेसळ सुरू असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. मागील चार महिन्यांपूर्वी काही ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यावेळी झालेल्या कारवाईबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता.

दरम्यान शेतकरी ऋषिकेश साळुंखे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह दुग्ध विकास मंत्र्यांकडे तक्रार देत कारवाईची मागणी केली होती. यानुसार आज तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची चार पथके दाखल झाली. पथकांनी बनपुरी येथील चिलिंग सेंटर वर संकलन होणाऱ्या दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

Web Title: Milk adulteration food and drug administration raid in Atpadi taluka of Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.