लाॅकडाऊनच्या भीतीने दूध दरवाढ थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:25 AM2021-03-21T04:25:19+5:302021-03-21T04:25:19+5:30
गतवर्षी ऐन उन्हाळ्यात दुधाची कमतरता भासू लागली होती. अशावेळी दूध दरात मोठी वाढ होऊन दूध उत्पादकांना दिलासा मिळणार होता; ...
गतवर्षी ऐन उन्हाळ्यात दुधाची कमतरता भासू लागली होती. अशावेळी दूध दरात मोठी वाढ होऊन दूध उत्पादकांना दिलासा मिळणार होता; पण अचानक आलेल्या कोरोना संकटाने दूध व्यवसायाची मोठी हानी झाली. गत वर्षाचे कोरोना संकट दूर होऊन पुन्हा दूध व्यवसायात आशादायी चित्र निर्माण होऊ लागले होते; पण यावर्षी ही कोरोना संकटाने दुधात मिठाचा खडा टाकत व्यवसायाला पुन्हा ब्रेक लावण्याचे काम केले आहे.
कोरोना संकटाने पशुधन मोठ्या प्रमाणावर घटल्याने दूध उत्पादनात मोठी घसरण झाली. याचा उलट परिणाम बाजारात दूध व दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असल्याने दुधाला चांगले दिवस आले होते.
यावर्षी परराज्यातील खासगी दूध डेअऱ्यांनी दूध दरात मोठी वाढ केली आहे; पण स्थानिक सहकारी दूध संघांनी कोरोनाच्या भीतीने दूध दर वाढ थांबली असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
चाैकट-
शेतकरी अडचणीत
कोरोना संकटाने अनेक दूध संघ आर्थिक संकटाचा सामना अजूनही करीत आहेत.
याउलट पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. कच्या मालाचे दर वाढल्याचे कारण देत अनेक पशुखाद्य कंपन्यांनी पशुखाद्य दरात भरमसाट वाढ केली आहे. सरकीपेंड १५५०, गोळी १६००, खपरी १२५०, मकाचुनी ८९० यासह सर्वच खाद्याचे दर भडकल्याने दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे.