अपंगांना अनुदानावर चक्की, शेळी गट देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:30 AM2021-03-09T04:30:15+5:302021-03-09T04:30:15+5:30
ते म्हणाले, स्वीय निधीतून अपंगांसाठी दोन शेळ्यांचा एक गट व पिठाची चक्की देण्यात येणार आहे. शेळी गटासाठी १२ हजार ...
ते म्हणाले, स्वीय निधीतून अपंगांसाठी दोन शेळ्यांचा एक गट व पिठाची चक्की देण्यात येणार आहे. शेळी गटासाठी १२ हजार तर चक्कीसाठी १३ हजार रुपये अनुदान आहे. यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेळी गटाचा लाभ ३९१ तर पिठाच्या चक्कीचा लाभ २११ लाभार्थींना देण्यात येणार आहे. याशिवाय नवबौद्ध घटकासाठी योजना राबवण्यासाठी २७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, पिठाच्या चक्कीसाठी २१० लाभार्थींना प्रत्येकी १२ हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज ग्रामपंचायतीत सादर करावेत.
चौकट
जाचक कागदपत्रे कमी करा : सुरेंद्र वाळवेकर
या योजनेसाठी पात्र ठरवण्यासाठी विविध कागदपत्रे द्यावी लागतात. अनेकदा ही कागदपत्रे वेळेत उपलब्ध होत नाहीत. लाभाची रक्कम पाहता कागदपत्रे गोळा करण्यासाठी होणार खर्च व वेळ फार जातो. उत्पन्नाचा दाखला मिळवतानाच अनेक हेलपाटे होतात. तहसीलदारांच्या दाखल्याऐवजी केसरी कार्ड ग्राह्य धरण्यासह इतर जाचक अटी कमी करण्याबाबत राज्य पातळीवरून धोरणात्मक निर्णय होणे गरजेचे आहे, अशी मागणी सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांनी केली आहे.