गोटखिंडी परिसरात गारपिटीने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:29 AM2021-04-28T04:29:13+5:302021-04-28T04:29:13+5:30
सोमवारी रात्री विजेच्या कडकडाटासह वादळी वारे व गारपीट झाली. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोमवारी झालेल्या गारपिटीने चाळीस ...
सोमवारी रात्री विजेच्या कडकडाटासह वादळी वारे व गारपीट झाली. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोमवारी झालेल्या गारपिटीने चाळीस एकरावरील केळीचे नुकसान झाले आहे. धनाजी थोरात, रमेश पाटील, पंडितराव जाधव, प्रकाश पाटील, जयंवत पाटील, अशोक कुलकर्णी, धैर्यशील थोरात, उमेश पाटील, संजय पाटील, सुवर्णा थोरात, इंदुमती पाटील यांच्या केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दगडू येवले यांची ढोबळी मिरची, दत्तात्रय कोकाटे यांचे टोमॅटो, राहुल माळी यांची मिरची, प्रताप थोरात यांची ढोबळी मिरची, सुभाष खोचीकर यांचे टोमॅटो, सर्जेराव पाटील यांचे भाजीपाल्याचे नुकसान झाले. नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
फोटो : २७ गाेटखिंडी
ओळ : गोटखिंडी (ता. वाळवा) येथे सोमवारी वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसामुळे केळीचे नुकसान झाले.