Social Viral: 'लाडकी बहीण' योजनेवरुन मिम्सचा धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 05:57 PM2024-07-10T17:57:40+5:302024-07-10T18:02:18+5:30

भाऊ, दाजी अन् मेहुण्यांचाही मुख्यमंत्र्यांकडे लाडके होण्याचा हट्ट

Mims on social media about Chief Minister Ladki Bahin Yojana | Social Viral: 'लाडकी बहीण' योजनेवरुन मिम्सचा धुमाकूळ

Social Viral: 'लाडकी बहीण' योजनेवरुन मिम्सचा धुमाकूळ

जालिंदर शिंदे

घाटनांद्रे : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ''मुख्यमंत्री लाडकी बहीण'' योजनेच्या संदर्भात सोशल मीडियावर अनेक गमतीजमती सांगणाऱ्या मिम्सने (रील्सने) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पुरुषांनी लाडका भाऊ योजनेची सरकारकडे जोरदार मागणी सुरू केली आहे.

परंतु, शासनाच्या जाचक अटीमुळे या लाडक्या बहिणीलाच आपण सावत्र असल्याचे वाटत असल्याची भावना व्यक्त होत आहे. लाडका भाऊ योजना, लाडकी बायको योजना, ''लाडका मेहुणा'' योजनेच्याही मागण्या करणाऱ्या गमतीदार मिम्स (रील्स) मनोरंजक ठरत आहेत.
लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून सोशल मीडियावर या योजनेचे सर्वाधिक मिम्स (रील्स) व्हायरल होऊ लागले आहेत.

सोशल मीडियावर सर्वाधिक प्रतिसाद मिळवणारी ही शासकीय योजना सध्या ठरली आहे. एरवी शासकीय योजनांची माहिती सोशल मीडियावर फारशी चर्चेला कधी येत नाही. पण, या योजनेच्या बाबतीत मात्र अगदी उलटे झाले आहे. पुरुष मंडळींकडून महिलांच्या नावाने योजना सुरू होत असल्याने अगदी जळफळाट व्यक्त करणारे मिम्स (रील्स) पाहण्यास मिळत आहेत.

लाडका भाऊ बेकार आहे, त्यांनाच काही तरी पैसे द्यावेत, असे संदेश फिरतानाचे दिसत आहेत. लग्नाआधीच एकटा भाऊ तोही बेरोजगार आहे. त्यांची योजनेची मागणी हास्याच्या फवाऱ्यात नेहत आहे. जावयाकडून लाडक्या मेहुण्यासाठी ''लाडका पावणा'' योजना सुरू करण्याच्या गमतीने, तर वाचकांची हसता हसता पुरेवाट होऊ लागली आहे. घरात महिलांशी पुरुषांनी सन्मानाने वागावे. कारण आता त्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी झाल्या आहेत, असाही संदेश हास्याची लक्तरे टांगू लागला आहे.

महिला लाभार्थीच्या संदर्भात तर अगदी तुफानी मिम्स (रील्स) सुरू आहेत. योजनेच्या जाचक अटीमुळे लाडकी बहीणऐवजी ही ''सावत्र बहीण योजना'' करावी, अशा मागणीचाही मीम्स (रील्स) फिरू लागल्या. नंतर लगेच जाचक अटी शिथिल झाल्याने पुन्हा सावत्रऐवजी बहीण आता पुन्हा लाडकी वाटू लागली आहे. काही महिलांनी मोफत एसटीसाठी प्रवासासाठी आपले वय वाढवून घेतल्याने आता या बहिणीला योजनाच मिळणार नाही, असाही संशोधनपर मिम्स (रील्स)समोर आला आहे. त्यामुळे त्यांची मोठी पंचायत झाल्याचेही समोर आले आहे.

Web Title: Mims on social media about Chief Minister Ladki Bahin Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.