वारणालीतील नियोजित हॉस्पिटलच्या जागेची मंत्री जयंत पाटील यांच्याकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:25 AM2021-05-17T04:25:50+5:302021-05-17T04:25:50+5:30
कुपवाड : वारणाली येथील नियोजित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेची रविवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाहणी केली. या जागेवर हॉस्पिटल ...
कुपवाड : वारणाली येथील नियोजित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेची रविवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाहणी केली. या जागेवर हॉस्पिटल पूर्णत्वासाठी भूमिपूजन समारंभ घेऊन कामास लवकरच सुरुवात करणार असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
वारणालीतील नियोजित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची जागा श्रेयवादामध्ये अडकून पडली होती. महापालिकेतील मागील सत्ताधाऱ्यांनी या हॉस्पिटलच्या जागाबदलाचा ठराव केला होता; परंतु नगरविकास विभागाने तो ठराव विखंडित केला. त्यामुळे पुन्हा वारणाली येथील जागेवर हॉस्पिटल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळेच मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी जागेची पाहणी केली. ही जागा श्रेयवादात न अडकविता, नागरिकांच्या हिताचा विचार करून हॉस्पिटल लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना जयंत पाटील यांनी प्रशासनास दिल्या.
यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, नगरसेवक विष्णू माने, शेडजी मोहिते, संतोष पाटील, आयुब बारगीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय बजाज, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष राहुल पवार, शेखर माने, सुनील भोसले, नगर अभियंता पी. एल. हलकुडे, शाखा अभियंता वैभव वाघमारे, आदी उपस्थित होते.
फोटो : १५ कुपवाड १
ओळ : वारणालीतील नियोजित हॉस्पिटलच्या जागेची मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी पाहणी केली. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, नगरसेवक विष्णू माने, शेडजी मोहिते, संतोष पाटील उपस्थित होते.