मंत्री जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात तडजोडीच्या राजकारणाचे संकेत, आगामी पालिका निवडणुकीत कुरघोड्यांची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 03:58 PM2022-05-30T15:58:36+5:302022-05-30T15:59:08+5:30

एकीकडे राष्ट्रवादी भक्कम असली तरीही पालकमंत्री जयंत पाटील यांचा बालेकिल्ला डळमळीत करण्यासाठी भाजपमधील वरिष्ठ नेते इस्लामपुरात तळ ठोकणार, हेही निश्चित आहे.

Minister Jayant Patil's signature of compromise politics in Islampur in the upcoming municipal elections | मंत्री जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात तडजोडीच्या राजकारणाचे संकेत, आगामी पालिका निवडणुकीत कुरघोड्यांची चिन्हे

मंत्री जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात तडजोडीच्या राजकारणाचे संकेत, आगामी पालिका निवडणुकीत कुरघोड्यांची चिन्हे

googlenewsNext

अशोक पाटील

इस्लामपूर : आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची गर्दी होणार हे निश्चित आहे. यातूनही उमेदवारी मिळाली नाही तर कुरघोड्यांला उत येणार आहे. याचाच फायदा विकास आघाडीला होण्याची शक्यता गृहीत धरून पालिकेच्या राजकारणात सक्रिय नेत्यांनी आतापासूनच तयारी चालविली आहे. दोन्ही गटातील नेते आपला प्रभाग सुरक्षित करण्यासाठी ‘सेटलमेंट’च्या प्रयत्नात असल्याची चर्चा पालिका निवडणुकीअगोदरच सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीमध्ये संग्राम पाटील, सुभाष सूर्यवंशी, बाबा सूर्यवंशी, चिमन डांगे, विश्वास डांगे, पीरअली पुणेकर, संजय कोरे, अशोक देसाई, अंगराज पाटील, आनंदराव मलगुंडे, शहाजी पाटील, संदीप पाटील, दादा पाटील, खंडेराव जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. याव्यतिरिक्त मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते राष्ट्रवादीतून इच्छुक आहेत. त्यामुळे नाराजांची संख्या वाढणार आहे. यातूनच कुरघोड्यांचे राजकारण रंगणार आहे.

एकीकडे राष्ट्रवादी भक्कम असली तरीही पालकमंत्री जयंत पाटील यांचा बालेकिल्ला डळमळीत करण्यासाठी भाजपमधील वरिष्ठ नेते इस्लामपुरात तळ ठोकणार, हेही निश्चित आहे. परंतु विकास आघाडीतील सर्व घटक पक्ष व नेते एकत्रित येणार का? यावर आजही प्रश्नचिन्ह आहे. माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील आपल्या ताकदीवर किती उमेदवार देणार? महाडिक गटाकडून कपिल ओसवाल, अनिता ओसवाल यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. याशिवाय सतीश महाडिक, जलाल मुल्ला, चेतन शिंदे, सुजित थोरात आदींनीही निवडणुकीची तयारी केली आहे.

विकास आघाडीमध्ये विक्रम पाटील यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या घरातील सुप्रिया पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. यादरम्यान काही नेते एकमेकांशी तडजोडी करून नुरा लढती करण्याच्या प्रयत्नात असल्याचे चित्र आहे.  जेणेकरून इस्लामपूर पालिकेच्या राजकारणात आपले अस्तित्व अबाधित राहील.

शिवसेना स्वबळाच्या भूमिकेवर अद्याप ठाम

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार स्वबळाचा नारा सोडण्यास तयार नाहीत. राष्ट्रवादी व शिवसेनेला आघाडीचा धर्म पाळावा लागला तर आगामी पालिका निवडणुकीची समीकरणे बदलतील हे मात्र निश्चित.

Web Title: Minister Jayant Patil's signature of compromise politics in Islampur in the upcoming municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.