इस्लामपुरातील शिवभोजन केंद्राला गृहराज्यमंत्र्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:27 AM2021-04-22T04:27:51+5:302021-04-22T04:27:51+5:30
इस्लामपूर येथे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी शिवभोजन केंद्राला भेट दिली. केंद्र संचालक रणजित शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ...
इस्लामपूर येथे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी शिवभोजन केंद्राला भेट दिली. केंद्र संचालक रणजित शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, सागर मलगुंडे, संजय विभुते उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : संचारबंदीच्या काळात गरीब-गरजूंना आधार देत असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्यावतीने मोफत दिल्या जाणाऱ्या शिवभोजन केंद्राला गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी येथे दिल्या जाणाऱ्या थाळीचा आस्वाद घेतला.
येथील प्रशासकीय इमारतीशेजारील शिवभोजन केंद्रात बुधवारी अचानक मंत्री देसाई यांनी भेट देत नागरिकांचा प्रतिसाद जाणून घेतला. शिवभोजन केंद्राचे संचालक रणजित शिंदे यांनी स्वागत केले. देसाई यांना आजच्या जेवणात असणारे पिठले, मसाल्याचे वांगे, भात, चपाती यांचे पार्सल दाखविण्यात आले. यावेळी उपस्थित असणाऱ्या गरजू नागरिकांना मंत्री देसाई यांनी, शिवभोजन कसे आहे, असा प्रश्न केला. घरच्यापेक्षा चांगले जेवण आम्हाला मिळत आहे. हाताचे काम थांबले तरी एक वेळेचे जेवण आम्हाला सरकारकडून देत असल्याबाबत त्यांनी आभार मानले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभुते, सागर मलगुंडे उपस्थित होते.