विश्वजितेश फाउंडेशनच्या पूरग्रस्त निवास केंद्रास मंत्री वडेट्टीवार यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:28 AM2021-07-28T04:28:42+5:302021-07-28T04:28:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुुपवाड : सांगलीतील विश्वजितेश फाउंडेशनच्यावतीने मार्केट यार्ड परिसरातील सहकार हॉल येथे ‘पूरग्रस्त निवास केंद्र’ उभारण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कुुपवाड : सांगलीतील विश्वजितेश फाउंडेशनच्यावतीने मार्केट यार्ड परिसरातील सहकार हॉल येथे ‘पूरग्रस्त निवास केंद्र’ उभारण्यात आले आहे. या निवास केंद्रात पूरग्रस्त नागरिकांना राहण्याची, नाष्टा-जेवणाची आणि वैद्यकीय सेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या पूरग्रस्त निवास केंद्रास मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व अन्न पुरवठा मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला.
कृष्णा नदीला महापूर आल्याने सांगली शहरातील वस्त्यांमध्ये आणि प्रमुख बाजारपेठांत पाणी शिरले. त्यामुळे हजारो लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांसाठी पालिका प्रशासनाच्यावतीने शहरातल्या महापालिका शाळांमध्ये आणि इतर खासगी ठिकाणी तात्पुरते निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
अन्न पुरवठा मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वजितेश फाउंडेशनच्या माध्यमातून सांगली मार्केट यार्ड परिसरातील सहकार हॉल येथे हे केेंद्र उभारण्यात आले आहे. या निवास केंद्रात पूरग्रस्त नागरिकांना राहण्याची, नाष्टा-जेवणाची आणि वैद्यकीय सेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या पूरग्रस्त निवास केंद्रास राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व अन्न पुरवठा मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला. या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी डॉ. जितेश कदम, पृथ्वीराज पाटील, महेंद्र लाड, विनायक रूपनर उपस्थित होते.