मिरजेत मीरासाहेब उरुसास प्रारंभ, चर्मकार समाजातर्फे मानाचा गलेफ अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 03:36 PM2019-04-01T15:36:41+5:302019-04-01T15:41:22+5:30

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मिरजेतील मीरासाहेबांच्या उरुसास मानकरी चर्मकार समाजातर्फे सोमवारी मानाचा गलेफ अर्पण करुन उत्साहात प्रारंभ झाला. परंपरेप्रमाणे दर्गा पटांगणावर मंडप उभारणी करण्यात आली आहे.

Mirage begins with Mirasaheb Urusas, offering the Charmakarag calf | मिरजेत मीरासाहेब उरुसास प्रारंभ, चर्मकार समाजातर्फे मानाचा गलेफ अर्पण

मिरजेत मीरासाहेब उरुसास प्रारंभ, चर्मकार समाजातर्फे मानाचा गलेफ अर्पण

googlenewsNext
ठळक मुद्देचर्मकार समाजातर्फे मानाचा गलेफ अर्पणमंगळवारपासून रंगणार संगीत महोत्सव

मिरज : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मिरजेतील मीरासाहेबांच्या उरुसास मानकरी चर्मकार समाजातर्फे सोमवारी मानाचा गलेफ अर्पण करुन उत्साहात प्रारंभ झाला. परंपरेप्रमाणे दर्गा पटांगणावर मंडप उभारणी करण्यात आली आहे.



चर्मकार समाजातर्फे मानाचा गलेफ अर्पण केल्यानंतर विविध संस्थांच्यावतीने मीरासाहेब दर्ग्याला गलेफ चढविण्यात आले. उरुसानिमित्त दर्गा इमारतीला विद्युत रोषणाई करण्यात आली असून शहर पोलीस ठाणे ते स्टँड चौकापर्यंत सुमारे दीड किलोमीटर रोडवर रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटण्यात आली आहेत.


या उरुसाच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारपासून अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेची सुरुवात होणार असून, दर्गा परिसरातील ऐतिहासिक चिंचेच्या झाडाखाली देशभरातील नामांकीत कलाकार संगीतसेवा सादर करणार आहेत.

Web Title: Mirage begins with Mirasaheb Urusas, offering the Charmakarag calf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.