मिरजेत रेल्वेस्थानकात चाकूने भोसकून खून

By admin | Published: February 28, 2017 12:51 AM2017-02-28T00:51:02+5:302017-02-28T00:51:02+5:30

संशयितास अटक : भांडणातून दारूच्या नशेत वार

In the Mirage Railway Station, a knife blew his blood | मिरजेत रेल्वेस्थानकात चाकूने भोसकून खून

मिरजेत रेल्वेस्थानकात चाकूने भोसकून खून

Next



मिरज : मिरज रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर महादेव चव्हाण (वय ६०, रा. बेळगाव) या हॉटेलात आचारीकाम करणाऱ्या वृद्धाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली. दारूच्या नशेत असलेला मारेकरी सत्यनारायणदास रामदाससिंग भदौरिया (५६, रा. खलीलपूर, जि. भिंड, मध्य प्रदेश) याला घटनास्थळीच रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. रेल्वे प्लॅटफॉर्मवर सर्वांसमक्ष घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे खळबळ उडाली होती.
मृत महादेव चव्हाण बेळगाव येथील रहिवासी असून, तो काही वर्षांपासून मिरज-पंढरपूर रस्त्यावरील एका हॉटेलात आचारी म्हणून काम करीत होता. त्याचा साथीदार सत्यनारायणदास भदौरिया साधूच्या वेशात भीक मागत होता. दोघेही रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर आश्रयाला असल्याने दोघांची मैत्री होती. सोमवारी सकाळी अकरा वाजता महादेव व सत्यनारायणदास रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर मद्य प्राशन करीत बसले होते. महादेव हा सत्यनारायणदास यास दारूच्या नशेत काही तरी बोलला. त्यामुळे दोघांत बाचाबाची सुरू झाली. दारूच्या नशेत असलेल्या सत्यनारायणदास याने जवळील चाकूने महादेव याच्या पोटावर व छातीवर चार वार केले. या चाकू हल्ल्यात महादेव चव्हाण याच्या पोटातील आतडी बाहेर पडून, त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याआधी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महादेवचा आरडाओरडा ऐकून, तेथे बंदोबस्तास असलेले पोलिस कर्मचारी प्रकाश कुंभार व प्रमोद सुरवसे यांनी सत्यनारायणदास भदौरिया यास पकडले.
रेल्वे प्लॅटफॉर्मवर घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे मोठी गर्दी जमली होती. पोलिस निरीक्षक रमेश भिंगारदेवे यांच्यासह रेल्वे पोलिसांनी मृतदेह व रक्ताने माखलेला चाकू ताब्यात घेतला. खूनप्रकरणी पोलिस कर्मचारी प्रकाश कुंभार यांनी पोलिसात फिर्याद दिली असून, सत्यनारायणदास भदौरिया याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: In the Mirage Railway Station, a knife blew his blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.