Sangli: मिरज-बिकानेर एक्स्प्रेसला अखेर सांगली, किर्लोस्करवाडी थांबा मंजूर 

By अविनाश कोळी | Published: July 16, 2024 01:00 PM2024-07-16T13:00:20+5:302024-07-16T13:01:06+5:30

प्रवाशांच्या मागणीची दखल

Miraj-Bikaner Express finally sangli, Kirloskarwadi stop approved | Sangli: मिरज-बिकानेर एक्स्प्रेसला अखेर सांगली, किर्लोस्करवाडी थांबा मंजूर 

Sangli: मिरज-बिकानेर एक्स्प्रेसला अखेर सांगली, किर्लोस्करवाडी थांबा मंजूर 

सांगली : मिरज ते बिकानेर व बिकानेर ते मिरज या नव्या गाडीला मध्य रेल्वेने हिरवा कंदील दाखविताना किर्लोस्करवाडी व सांगलीत थांबा दिला नव्हता. सामाजिक संघटनांनी संताप व्यक्त केल्यानंतर ‘लोकमत’ने यावर प्रकाशझोत टाकला. त्याची दखल घेत रेल्वेने दोन्ही स्थानकांवर थांबा मंजूर केला. त्यामुळे येथील सामाजिक, तसेच प्रवासी संघटनांनी समाधान व्यक्त केले.

बिकानेरला जाण्यासाठी जिल्ह्यातील प्रवाशांना पूर्वी थेट पर्याय नव्हता. मिरज ते पुणे, अशी गाडी पकडून पुढे पुण्यातून बिकानेरला जावे लागत होते. त्यामुळे नागरिक जागृती मंचने मिरज ते बिकानेर थेट रेल्वे गाडी देण्याची मागणी केली होती. माजी खासदार यांच्यामार्फत या गाडीसाठी रेल्वे मंत्रालयाशी पत्रव्यवहार झाला होता. या गाडीची मागणी करताना मिरज ते पुणे गाडीला मंजूर असलेले थांबे नव्या गाडीत कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली होती; मात्र मिरज ते बिकानेर व बिकानेर ते पुणे या एक्स्प्रेसला सांगली व किर्लोस्करवाडीचा थांबा नाकारण्यात आला होता. त्यामुळे येथील प्रवासी संघटना व नागरिक जागृती मंचने संताप व्यक्त केला होता. अखेर रेल्वेने ही मागणी मान्य केली.

इंदुरानी दुबे यांच्याकडून पाठपुरावा

मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक इंदुरानी दुबे यांनी मिरज ते बिकानेर एक्स्प्रेसला सांगली व किर्लोस्करवाडी येथे थांबा मिळण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे सोमवारी याबाबतचा निर्णय रेल्वे बोर्डाने जाहीर केला.

सांगली, किर्लोस्करवाडीत किती वाजता येणार?

  • गाडी क्र. २०४७६ ही मिरज-बिकानेर एक्स्प्रेस प्रत्येक मंगळवारी सांगली स्थानकावरून दुपारी २:३५ ला सुटेल. किर्लोस्करवाडीत दुपारी ३ वाजता पोहचणार असून, दुसऱ्या दिवशी रात्री ८:४० ला ही गाडी बिकानेरला पोहोचेल.
  • गाडी क्र. २०४७५ बिकानेर-मिरज एक्स्प्रेस बिकानेरहून प्रत्येक सोमवारी सकाळी साडेसात वाजता रवाना होऊन किर्लोस्करवाडीत ११:५० वाजता, तर सांगली स्टेशनवर मंगळवार दुपारी १२:२७ वाजता पोहोचेल.


इंदुरानी दुबे यांच्याकडे सांगली व किर्लोस्करवाडीत थांबा देण्याची विनंती केली. दुबे यांच्यासह महाराष्ट्र भाजप रेल्वे अर्थसंकल्पचे अध्यक्ष कैलास लक्ष्मण वर्मा यांनीही सांगली व किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबा मिळण्यासाठी मुंबईतील मध्य रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. - संजय पाटील, माजी खासदार

Web Title: Miraj-Bikaner Express finally sangli, Kirloskarwadi stop approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.