मिरजेत बंगला फोडून दागिने, रोख रक्कम चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:25 AM2021-09-13T04:25:18+5:302021-09-13T04:25:18+5:30
मिरज-पंढरपूर रस्त्यावरील साळुंखे महाविद्यालयाच्या पाठीमागे स्वामी विवेकानंदनगर येथे अभियंता अमित फाकडे यांचा शार्दूल निवास हा बंगला आहे. फाकडे ...
मिरज-पंढरपूर रस्त्यावरील साळुंखे महाविद्यालयाच्या पाठीमागे स्वामी विवेकानंदनगर येथे अभियंता अमित फाकडे यांचा शार्दूल निवास हा बंगला आहे. फाकडे परगावी गेल्याची संधी साधून दि. १ ते ८ सप्टेंबर या कालावधीत रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फाकडे यांच्या बंद बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. बेडरुममधील दोन हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, अडीच हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व तीन हजार रुपयांची रोख रक्कम असा साडेसात हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. अमित फाकडे हे घरी परत आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसले. याबाबत त्यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. शहर व परिसरात चोऱ्या व घरफोड्यांचे सत्र सुरू आहे. आठ दिवसांपूर्वी रमा उद्यान येथे बंगला फोडण्यात आला होता. चोरटे बंद बंगले फोडत असल्याने पोलिसांनी रेकाॅर्डवरील चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.