मिरजेत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:30 AM2021-07-14T04:30:49+5:302021-07-14T04:30:49+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मिरज : मिरजेत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय, पीआरपी व इतर पक्षांतील कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरजेत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय, पीआरपी व इतर पक्षांतील कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणाऱ्या सत्ताधारी पक्ष व इतर पक्षांतील कार्यकर्त्यांचे जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे यांनी गावागावात वंचितांना एकत्र करून वंचित बहुजन आघाडी मजबूत करून वंचित समाजात जागृतीचे आवाहन वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना केले.
यावेळी जिल्हा महासचिव उमर फारूख ककमरी, उपाध्यक्ष चंद्रकांत खरात, गौतम लोटे, मनोहर कांबळे, संजय कांबळे, शेखर पावसे, सनी गायकवाड, केतन माने, प्रशांत वाघमारे, अनिल अंकलखोपे, वसंत भोसले, अशोक लोंढे, श्रीकांत ढाले, दीक्षांत सावंत, किशोर आढाव, पृथ्वीराज कांबळे, प्रशांत कदम, प्रमोद मल्लाडे, सागर आठवले, सतीश शिकलगार, अनिल मोरे, अरुण कांबळे, रवींद्र विभुते, विक्रम कोलप, सिद्धार्थ कांबळे, सर्जेराव सावंत, लक्ष्मण देवकर, चंद्रकांत होवाळे, केशव आठवले, तुषार कांबळे, हरिश वाघमारे, प्रथमेश बनसोडे, वसंत गाडे, अजित गाडे, आनंद गाडे, जयंत गाडे, शीतल कोलप, मधुकर कोलप, हिरामण भगत, सागर आवळे, ऋषिकेश माने उपस्थित होते.