मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय पुन्हा कोविड रूग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 11:11 AM2021-02-27T11:11:45+5:302021-02-27T11:20:10+5:30
CoronaVirus Miraj Medical Hospital sangli- सध्या कोविड-19 विषाणू बाधित होणाऱ्या रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिलेल्या सूचनेनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज हे रूग्णालय दि. 1 मार्च 2021 पासून पुन्हा कोविड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे.
सांगली : सध्या कोविड-19 विषाणू बाधित होणाऱ्या रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिलेल्या सूचनेनुसार शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय व रूग्णालय मिरज हे रूग्णालय दि. 1 मार्च 2021 पासून पुन्हा कोविड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या रूग्णालयात मार्चपासून कोविड बाधीत व संशयीत रूग्णावरच वैद्यकीय उपचार सुविधा देण्यात येणार आहे.
मिरज व आसपासच्या नागरिकांनी नॉन कोविड रूग्णांना वैद्यकीय उपचारासाठी सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे मार्चपासून वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज चे अधिष्ठाता डॉ. प्रदिप दिक्षीत यांनी केले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज हे रूग्णालय दि. 28 मार्च 2020 पासून कोविड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यात कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नॉन कोविड रूग्णांकरिता काही चिकित्सालयीन विभागातील रूग्णसेवा दि. 1 फेब्रुवारी 2021 पासून सुरू करण्यात आली होती.
परंतु सध्या कोविड-19 विषाणू बाधित होणाऱ्या रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने हे रूग्णालय पुन्हा कोविड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले असल्याचे डॉ. दिक्षीत यांनी सांगितले.