मिरज जंक्शन रेल्वेस्थानकाची दुरवस्था : मध्य रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 11:53 PM2018-12-08T23:53:55+5:302018-12-08T23:55:48+5:30

मिरज : महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांना सीमेवरील मिरज जंक्शन रेल्वेस्थानक प्रवासी सुविधांच्या प्रतीक्षेत आहे. अपुरा निधी, स्थानिक ...

Miraj junction railway station's drought: Central Railway administration ignored | मिरज जंक्शन रेल्वेस्थानकाची दुरवस्था : मध्य रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

मिरजेच्या रेल्वे स्थानकातील पादचारी पूल नादुरुस्त असल्याने प्रवासी जीव धोक्यात घालून रेल्वे मार्ग ओलांडत आहेत.

Next
ठळक मुद्देप्रवासी सुविधांच्या प्रतीक्षेत, प्रवासी संघटनेकडून पाठपुरावारेल्वे अधिकाºयांची उदासीनता

मिरज : महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांना सीमेवरील मिरज जंक्शन रेल्वेस्थानक प्रवासी सुविधांच्या प्रतीक्षेत आहे. अपुरा निधी, स्थानिक अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मिरज जंक्शन स्थानकाचा विकास रखडला आहे.

मिरज रेल्वेस्थानकातून दररोज पॅसेंजर व लांब पल्ल्यांच्या ६५ रेल्वे गाड्यांव्दारे दररोज ७० हजार प्रवासी ये-जा करतात. वैद्यकीय व संगीतनगरी असलेल्या मिरजेत दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असतानाही रेल्वेस्थानकात पिण्याच्या पाण्यापासून ते शौचालयापर्यंत अपुऱ्या सुविधांमुळे प्रवासी त्रस्त आहेत. प्रवाशांना दूषित पिण्याचे पाणी, एक वगळता अन्य प्लॅटफॉर्मवर शौचालयांची गैरसोय, अवैध खाद्य विक्रेते, भिकारी, व्यसनी, तृतीयपंथीयांचा प्रवाशांना उपद्रव सुरू आहे. अपघातात जखमी प्रवाशांना नेण्यासाठी रेल्वेस्थानकात रेल्वेची रुग्णवाहिका नसल्याने जखमींना रिक्षातून न्यावे लागते.

वेळेवर वैद्यकीय मदत मिळत नसल्याने अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. मिरज-बेल्लारी व मिरज-यशवंतपूर दोन एक्स्प्रेस वगळता मोठ्या शहरांना जोडणाºया अन्य सर्व एक्स्प्रेस गाड्या कोल्हापुरातून सुटतात.
स्थानकातील सहा प्लॅटफॉर्मपैकी काही प्लॅटफॉर्म कमी उंचीचे व सदोष असल्याने अपघातात प्रवासी जखमी होतात. रेल्वेगाडीच्या दरवाजाची पायरी आणि प्लॅटफॉर्मच्या उंचीमध्ये काही फुटाचा फरक असल्याने आजारी, वृध्द, महिला व लहान मुलांना गैरसोयीचे आहेत. स्थानकात एकाच प्लॅटफॉर्मवर कोच इंडिकेटर बसविण्यात आले आहेत.

प्रवाशांचे साहित्य चोरी, लुटमार, रेल्वे तिकिटांचा काळाबाजार याकडे रेल्वे सुरक्षा दलाचे दुर्लक्ष होत आहे. स्थानकाच्या स्वच्छतेसाठी पूर्वी रेल्वेचे व ठेकेदाराचे सफाई कर्मचारी होते. मात्र, गेल्या काही वर्षात सफाईचा ठेका खासगी ठेकेदाराकडे देण्यात आला आहे. खासगी ठेकेदाराचे स्वच्छता कर्मचारी अपुरे असल्याने स्थानकात अस्वच्छता दिसत आहे.

येथील पादचारी पूल नादुरुस्त असल्याने गर्दीच्यावेळी प्रवासी जीव धोक्यात घालून रेल्वे मार्ग ओलांडत आहेत. मिरज स्थानकात फलाट क्र. १ ते ६ वर जाण्या-येण्याकरिता दक्षिण व उत्तर बाजूकडे दोन पादचारी पूल आहेत. नव्याने उभारलेल्या दक्षिण बाजूकडील पुलाची उंची जास्त असल्याने प्रवाशांकडून या पुलाचा फारसा वापर होत नाही. उत्तर बाजूकडे ५० वर्षांपूर्वीचा जुना पादचारी पूल नादुरुस्त असल्याने प्लॅटफॉर्म क्र. ५ व ६ वर येण्या-जाण्यासाठी मार्ग बंद करण्यात आला आहे. या पुलालगत लिफ्टच्या सुविधेसह नवीन पादचारी पूल उभारणीचे कामही गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. जुन्या पादचारी पुलाचा वापर सुरू आहे. मात्र हा जुना पूल कालबाह्य झाल्याने गर्दी वाढल्यास अपघाताचा धोका आहे. स्थानकातील दोन पादचारी पुलांची अशी स्थिती असल्यामुळे प्लॅटफॉर्म क्र. ५ व ६ वर येणाºया पॅसेंजर गाडीमधील प्रवासी नवीन पादचारी पुलाएवजी रेल्वे मार्ग ओलांडत धोका पत्करुन फलाट क्र. ३ व ४ कडे येतात. अशा प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा दलाकडून दंडात्मक कारवाई केली जाते, मात्र तरीही जीव धोक्यात घालून प्रवासी रुळ ओलांडतच आहेत.

परिसर अंधारात : प्रवाशांची लूटमार
स्थानकाच्या उत्तरेकडील पादचारी पूल बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. स्थानकाबाहेर दिवे बंद असल्याने रात्रीच्यावेळी प्रवाशांची लूटमार सुरू आहे. स्थानकाच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे व बॅग स्कॅनर यंत्र बंद आहे. रेल्वेस्थानकात डॉक्टर उपलब्ध नसल्याने प्रवाशांना वैद्यकीय सुविधा मिळत नाही.

रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सुविधांसाठी प्रवासी संघटनांतर्फे पाठपुरावा केला जातो. मात्र, मागण्यांबाबत रेल्वे अधिकाºयांकडून प्रतिसाद मिळत नाही. वरिष्ठ अधिकाºयांचा दौºयाप्रसंगी स्थानकात स्वच्छता, साफसफाई व इतर कामे करण्यात येतात. मात्र इतरवेळी रेल्वे प्रवाशांना गैरसोयींना तोंड द्यावे लागते. काही वर्षापूर्वी रेल्वे अंदाजपत्रकात मॉडेल रेल्वेस्थानकात समावेश करण्यात आलेल्या मिरज स्थानकाचा विकास रखडला आहे.


 

Web Title: Miraj junction railway station's drought: Central Railway administration ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.