संघर्ष टाळण्यासाठी मिरज जंक्शनचे नामकरण नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:26 AM2021-01-23T04:26:33+5:302021-01-23T04:26:33+5:30
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल व पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा यांचे शुक्रवारी विशेष रेल्वेने पाहणी दौऱ्यासाठी मिरज स्थानकात ...
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल व पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा यांचे शुक्रवारी विशेष रेल्वेने पाहणी दौऱ्यासाठी मिरज स्थानकात आगमन झाले. या वेळी रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष ॲड. ए.ए. काझी, उपाध्यक्ष जावेद पटेल, बाळासाहेब पाटील, मुस्तफा बुजरूक, संतोष माने, जहीर मुजावर, राकेश तामगावे, झोहेब मुल्ला यांनी मित्तल यांना निवेदन दिले. मिरज रेल्वे स्थानक नामकरणाबाबत विविध संघटना मागणी करीत आहेत. वेगवेगळ्या महापुरुषांच्या नावाच्या मागण्यांमुळे होणारा संघर्ष टाळण्यासाठी मिरज रेल्वे जंक्शन नामकरणाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये. मिरज स्थानकात पिट लाइनची संख्या वाढवावी, सकाळच्या सत्रात मिरज ते पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करावी, कोरोनाकाळात बंद केलेल्या पॅसेंजर व एक्स्प्रेस गाड्या पूर्ववत सुरू कराव्यात आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
फाेटाे : येणार आहे