मिरजेत कृष्णा माई उत्सव उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:29 AM2021-02-24T04:29:49+5:302021-02-24T04:29:49+5:30
मिरज : भक्ती, संस्कृती व पर्यावरणाचा संगम साधत मिरजेत कृष्णाघाटावर कृष्णामाई उत्सव साजरा करण्यात आला. मिरजेत ऐतिहासिक कृष्णा ...
मिरज : भक्ती, संस्कृती व पर्यावरणाचा संगम साधत मिरजेत कृष्णाघाटावर कृष्णामाई उत्सव साजरा करण्यात आला. मिरजेत ऐतिहासिक कृष्णा घाट येथे मार्कंडेय मंदिराच्या घाटावर उत्सवानिमित्त महापालिका व कृष्णा वेणी उत्सव समितीच्या स्वयंसेवकांनी घाटाची व नदी पात्राची स्वच्छता केली.
अंबाबाई मंदिर मिरज येथून श्री कृष्णा माई पालखी काढण्यात आली. मूर्ती प्रतिष्ठापना, पूजा विधीसह श्री राम कृपा भजनी मंडळ यांचे भजन, डॉ. मनोज पाटील यांचे पर्यावरणबाबत व्याख्यान, आमिषा करंबेळकर यांचे कथ्थक नृत्य, रश्मी सावंत, वैशाली जोगळेकर, बाजीराव कोपार्डे, श्रावणी सांगरोळकर यांचे गायन, कृष्णा माईची महाआरती व मिरजेतील पुरोहितांचे मंत्रपुष्प आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. सायंकाळी घाटावर दिवे लावून प्रकाशोत्सव करण्यात आला.
कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. शेखर राजदेरकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी संस्थानिक पद्माराजे पटवर्धन, किशोर पटवर्धन, इरावती पटवर्धन, दीपक शिंदे, दुर्गादेवी शिंदे, डॉ. महादेव कुरणे, विवेक शेटे, बाळ बरगाले, पोपट गोरे प्रमुख पाहुणे होते.
ओमकार शुक्ल, ऋषिकेश कुलकर्णी, दिगंबर कुलकर्णी, रुपाली देसाई, अनघा कुलकर्णी, श्रीपाद भट, संतोष कुलकर्णी, राजन काकीरडे, महेश पोंक्षे, कुश आठवले अरविंद रूपलग, ज्योती शुक्ल, माधुरी कापसे, हेमा कुलकर्णी, अपर्णा सोनीकर, नम्रता साठे, शोभा यादव, विनायक इंगळे, अनुराधा जोशी, राजश्री काकीरडे यांनी संयोजन केले. कविता घारे यांनी निवेदन केले.