मिरजेत देशी दारू विकणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:43 AM2021-05-05T04:43:20+5:302021-05-05T04:43:20+5:30
सांगली : मिरज येथील साकार लॉजसमोर बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेेषण शाखेच्या पथकाने अटक केली. ...
सांगली : मिरज येथील साकार लॉजसमोर बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेेषण शाखेच्या पथकाने अटक केली.
धीरज सुनील देसाई (वय ३६, रा. ब्राह्मणपुरी, मिरज), असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून ७६०० रुपये किमतीच्या १४६ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेली संचारबंदी व कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार तपासणीसाठी एलसीबीने पथक तयार केले आहे. सोमवारी हे पथक मिरज शहरात गस्तीवर असताना, शहरातील साकार लॉजजवळ देसाई पिशवीतून दारूच्या बाटल्या विक्री करीत होता. त्या पिशवीत ९० मि.लि.च्या १४६ बाटल्या होत्या. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात देसाई याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित सावंत, शशिकांत जाधव, सचिन कुंभार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.