मिरजेत महापालिका अधिकारी-कर्मचारी आणि दुकानदार यांच्यात धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 05:17 PM2019-01-31T17:17:25+5:302019-01-31T17:22:58+5:30
मिरजेत आज महापालिकेने पोलिस बंदोबस्तात जोरदार अतिक्रमण हटाव मोहिम राबवून खोकी व हातगाडे उध्वस्त केले. अतिक्रमण काढताना महापालिका अधिकारी-कर्मचार्यांसोबत विक्रेत्यांची झटापट आणि धक्काबुक्की झाली. खोकी ,हातगाडे काढताना, अधिकारी- कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करित एक हातगाडा पळवून नेला.
मिरज - मिरजेत आज महापालिकेने पोलिस बंदोबस्तात जोरदार अतिक्रमण हटाव मोहिम राबवून खोकी व हातगाडे उध्वस्त केले. अतिक्रमण काढताना महापालिका अधिकारी-कर्मचार्यांसोबत विक्रेत्यांची झटापट आणि धक्काबुक्की झाली. खोकी ,हातगाडे काढताना, अधिकारी- कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करित एक हातगाडा पळवून नेला.
शासकीय रुग्णालया समोर व मिशन रुग्णालयासमोरील अनधिकृत अतिक्रमणे महापालिकेने जमीनदोस्त केली. दुकाने तोडल्याने खोकीधारक आक्रमक झाले. महापालिका कर्मचारी आणि दुकानदार यांच्यात जोरदार बाचाबाचीचे प्रकार घडले.
अतिक्रमण पथकाने या मार्गावरील सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त केली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यांत येणार आहे.